एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 17/08/2017


1. मीच मुख्यमंत्री राहणार, दानवेंना प्रदेशाध्यक्षपदावरुन हटवणार नाही, भाजप प्रदेश कार्यकारिणीत देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण, ध्वजारोहणास विरोध करणारे देशद्रोही, मुख्यमंत्र्यांची टीका https://goo.gl/oBVpHP

2. कोपर्डी बलात्कार आणि हत्याप्रकरणातील आरोपींना सुप्रीम कोर्टाचा दणका, उज्ज्वल निकमांसह पाच जणांची साक्ष नोंदवण्याची याचिका फेटाळली https://goo.gl/wU5NJ1

3. विजेच्या खांबावर काम करताना झटका, नाशिकमध्ये महावितरण कर्मचाऱ्याचा मृत्यू, विसंवादामुळे घटना घडल्याचा प्रत्यक्षदर्शींचा दावा https://goo.gl/wvWr7d

4. मिरा भाईंदर निवडणुकीत मतदार यादीतील हजारो नावे खोटी, काँग्रेसचा आरोप, प्रचाराला आजपासून सुरुवात, मुख्यमंत्र्यांच्या दोन तर उद्धव ठाकरेंची एक सभा https://goo.gl/rfuASr

5. पुण्यातील अपहरण नाट्याला वेगळं वळण, रिक्षातून बाळाचं अपहरण नव्हे, आईनेच दहा दिवसांच्या बाळाला नदीत फेकलं, चौथी मुलगी झाल्याने रेश्मा शेखचं कृत्य https://goo.gl/BD4RbV

6. पुण्यातील न्यायाधीशाचा पती आणि वाहतूक पोलिस मारहाणप्रकरणात संभ्रम कायम, प्रथमदर्शनी पोलिसानेच हात उगारल्याचं समोर, अद्याप गुन्हा नाहीच https://goo.gl/Ufv7CU

7. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या घामाची माती, हजारो हेक्टरवरची पीकं करपली, मराठवाड्यात पाण्याविना पिकांची स्थिती भयाण https://goo.gl/nk6Edo

8. सरसंघचालक मोहन भागवतांना ध्वजारोहणापासून रोखणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यावरच कारवाई, केरळमधील पल्लकडचे जिल्हाधिकारी पी.मेरीकुथी यांची बदली https://goo.gl/DG82s6

9. सत्ता मिळण्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कधीही तिरंग्याला सलाम केला नाही, दिल्लीतल्या कार्यक्रमात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींचा संघावर निशाणा https://goo.gl/6mQNQu

10. जर मी रस्त्यावरील नमाज रोखू शकत नाही, तर मला पोलिस स्टेशनमधील जन्माष्टमीही रोखण्याचा अधिकार नाही, धार्मिक स्थळांवरील लाऊड स्पीकरबाबत योगी आदित्यनाथ यांचं वादग्रस्त वक्तव्य https://goo.gl/sMuLvw

11. पॅनपाठोपाठ केंद्र सरकारकडून 81 लाख आधार कार्ड रद्द, तुमच्या आधार कार्डचं स्टेटस इथे पाहा https://goo.gl/J3bLpb

12. 36 वर्षीय धोनीचा फिटनेस 28 वर्षीय विराट एवढाच, तर मनिष पांडे फिटनेस टेस्टमध्ये अव्वल, श्रीलंकेविरुद्धच्या वन डे मालिकेपूर्वी खेळाडूंची फिटनेस टेस्ट https://goo.gl/9L14Vc

13. आता 'द कपिल शर्मा शो'मधून नवज्योतसिंह सिद्धू बाहेर, आजारपणामुळे सिद्धू यांच्या खुर्चीत अर्चना पुरणसिंह, नाराज सिद्धूंनी कपिलला झापलं https://goo.gl/67Eowg

14. वादग्रस्त 'पहरेदार पिया की'विरोधात अखेर बीसीसीसीची कारवाई, मालिकेची वेळ बदलण्याचे सोनी टीव्हीला आदेश https://goo.gl/A7FcRg

15. अक्षय आणि भूमीची 'टॉयलेट एक प्रेम कथा' बॉक्स ऑफिसवर सुसाट, जगभरात कमाईचा आकडा 100 कोटींच्या पार, भारतात 89.95 कोटींचा गल्ला https://goo.gl/gxBHHD

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर