*एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 ऑक्टोबर 2019 | मंगळवार*

  1. शिवसेनाप्रमुखांच्या अटकेची फाईल युतीच्या काळात तयार झाली, मी फक्त सही केली, अजित पवारांनी एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत केलेल्या गौप्यस्फोटावर छगन भुजबळांचं उत्तर https://bit.ly/2ISTR5W


 

  1. दाऊदचा हस्तक इकबाल मिर्चीच्या कुटुंबियांशी कथित व्यवहाराप्रकरणी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेलांना ईडी नोटीस, 18 तारखेला चौकशी, गैरव्यवहार झाला नसल्याचं पटेलांकडून स्पष्ट https://bit.ly/2oHPkMM


 

  1. महात्मा फुले-सावित्रीबाई फुले आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्यासाठी पाठपुरावा करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन https://bit.ly/31k4i90 तर दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा भाजपचा संकल्प, भाजपचा जाहीरनामा प्रकाशित https://bit.ly/2ORl90f


 

  1. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत श्रीनिवास पाटील उदयनराजेंना दोन लाख मतांनी पराभव करतील, एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा दावा https://bit.ly/2B9RnvV


 

  1. अयोध्या प्रकरणाची सुनावणी उद्या संपण्याची शक्यता, सरन्यायाधीशांकडून उद्या खटल्याची सुनावणी संपवण्याचे संकेत, सर्व पक्षकारांच्या वकिलांना उद्या युक्तीवाद संपवण्याचे निर्देश https://bit.ly/2B9NVBt


 

  1. काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले नेते एकतर भाजपची संस्कृती बदलतील किंवा भाजप त्यांची संस्कृती बदलेल, माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत नितीन गडकरी यांचं भाकित https://bit.ly/33q1bOq


 

  1. अखेर नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपमध्ये विलीन, कणकवलीत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रवेश, तर आक्रमकतेसोबत संयमही गरजेचा, मुख्यमंत्र्यांचा नितेश राणेंना सल्ला https://bit.ly/2IQ9qvq


 

  1. नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पुण्यातील एसपी कॉलेजमधील झाडांवर कुऱ्हाड, सुरक्षेच्या कारणामुळे झाडं तोडल्याचा आयोजकांचा दावा https://bit.ly/35AtgnT


 

  1. पीएमसी बँक घोटाळ्यात पहिला बळी, 90 लाख थकीत राहिल्यानं खातेदार संजय गुलाठी यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू, कुटुंबियांचा बँक प्रशासनावर आरोप https://bit.ly/2MNf16C


 

  1. मतदारांचं लक्ष विचलित करण्यासाठी कलम 370 च्या मुद्द्याचा वापर, यवतमाळच्या वणीमध्ये राहुल गांधींचा मोदींवर घणाघात https://bit.ly/2ORqcOf


 

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBRK