एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 डिसेंबर 2019 | रविवार
1. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान करणाऱ्यांसोबत आम्ही बसू शकत नाही, हिवाळी अधिवेशनाअगोदरच्या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपचा बहिष्कार https://bit.ly/36BJw7V
2. स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबतची आमची भूमिका कधीही बदललेली नाही आणि बदलणारही नाही, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं स्पष्टीकरण https://bit.ly/2RUe011
3. तिन्ही पक्षांमधील विसंवाद आणि मंत्रीपदासाठीच्या खेचाखेचीमुळे महाविकास आघाडीचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप https://bit.ly/2PQrCrv
4. अमूल आणि मदर डेअरीसह इतर कपन्यांचं दूध महागलं, उद्यापासून 2 रुपयांची दरवाढ लागू https://bit.ly/34nVQHs
5. कोल्हापुरात चित्रपट महामंडळाच्या सभेत तुफान राडा, लंच ब्रेक घेतल्यानं गोंधळ, खोटा गुन्हा दाखल केलेल्या तिघांचं सभासदत्व रद्द करण्याची मागणी https://bit.ly/2RRNyVx
6. 'आरबीआय चोर है' अशा घोषणा देत पीएमसी बँकेच्या खातेधारकांचं रिझर्व्ह बँक आणि 'मातोश्री'बाहेर आंदोलन, राज्य सरकारडून शक्य ती मदत करण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आंदोलकांना आश्वासन https://bit.ly/35oNT6a
7. आंध्र प्रदेशप्रमाणे महाराष्ट्रातही बलात्काऱ्यांना शंभर दिवसांत फाशी, राज्य सरकार जानेवारीत प्रस्ताव आणणार असल्याची सूत्रांची माहिती https://bit.ly/35pWqWi
8. हार्ट अॅटकच्या रुग्णांना वेळेत मोफत उपचार देणारा व्हॉट्सअॅप ग्रुप, महिन्याभरात वाचले शंभराहून अधिक प्राण, गोंदियातील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. प्रमेश गायधनेंच्या प्रयत्नांना यश https://bit.ly/2rRc3rg
9. फास्टॅगचा निर्णय पुढे ढकलला, नव्या वर्षात लागू होणार, फास्टॅगचा तुटवडा भासल्यानं केंद्र सरकारचा निर्णय https://bit.ly/2YMYOnN
10. भारताचे वेस्ट इंडीजसमोर 289 धावांचे आव्हान, श्रेयस अय्यर, ऋषभ पंतची अर्धशतकं https://bit.ly/2YOcO0q
यूट्यूब चॅनेल - https://www.youtube.com/abpmajhatv
इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv
फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha
ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv
Android/iOS App ABPLIVE - https://goo.gl/enxBRK
एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 15 डिसेंबर 2019 | रविवार
एबीपी माझा वेबटीम
Updated at:
15 Dec 2019 06:41 PM (IST)
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या स्मार्ट बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेतला जातो.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -