एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 02/07/2017
1. गृहराज्यमंत्री रणजीत पाटलांच्या वडिलांची दादागिरी, कॉलेज कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली, विरोधकांच्या कॉलेजमधला विठ्ठल पाटलांचा थयथयाट कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/bnt46p
2. नियमित कर्ज भरणाऱ्यांना सरकारचा दिलासा, 25 टक्क्यांऐवजी आता 15 हजार रुपये अनुदान मिळणार, कमी कर्ज असणाऱ्यांना फायदा https://goo.gl/6ro9yV
3. कर्जमाफीच्या निकषांचा विरोध करत बीडच्या शेतकऱ्यांकडून कर्ज न भरण्याची शपथ, मंत्र्यांना गावबंदी करण्याचा साठेवाडीतल्या गावकऱ्यांचा निर्णय https://goo.gl/W9y7BH
4. मुंबईत आता 'म्हाडा'ची घरंही आवाक्याबाहेर, एका वर्षात तब्बल 60 लाखांनी किंमत वाढली, माहिती अधिकारातून आकडेवारी समोर https://goo.gl/e8Uvaa
5. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर ब्लू-बॉटल जेली फिशचा धोका, पावसाचा आनंद लुटणाऱ्या पर्यटकांना सावधानतेचा इशारा https://goo.gl/1kkmVJ
6. मुंबईतील मोठ्या संकुलांमधला ओला कचरा महापालिका उचलणार नाही, 2 ऑक्टोबरपासून निर्णयाची अंमलबजावणी https://goo.gl/yZF4VN
7. पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये तांबाडी नदीत अडकलेल्या व्यक्तीला 3 तासांनी बाहेर काढलं, तुफान पावसामुळे पालघरमध्ये 20 गावांचा संपर्क तुटला https://t.co/rQqYZbmUNA
8. भिवंडीत आयाकडूनच 5 वर्षांच्या मुलीचा 20 हजारात सौदा, पोलिसांकडून मुलीची सुटका, आयाला अटक https://goo.gl/NwmZ4w
9. मापात पाप करणाऱ्या पेट्रोल पंपांपैकी राज्यातली सर्वात मोठी कारवाई, नागपुरात 5 लिटरमागे 400 मिली पेट्रोल कमी https://goo.gl/uYBTak
10. विठुरायाची पंढरी आता नजरेच्या टप्प्यात, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराजांची पालखी वाखरी मुक्कामी, आज दोन्ही पालख्यांचं रिंगण http://abpmajha.abplive.in
11. उत्तर प्रदेशातील मुजोर भाजप कार्यकर्त्यांना जेलमध्ये टाकणाऱ्या 'मर्दानी' पोलीस अधिकाऱ्याची बदली, वादाला प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत श्रेष्ठा ठाकूर यांची बदली केल्याची चर्चा https://goo.gl/M58PTa
12. योगी आदित्यनाथांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीच सरकारच्या कामकाजावर नाराज, 4 जुलैपासून सरकारविरोधात आंदोलनाचा इशारा http://abpmajha.abplive.in
13. जीएसटीनंतर आयफोन आणि आयपॅड स्वस्त, भारतात आयफोनच्या किंमती पाच ते सहा हजार रुपयांनी कमी https://goo.gl/RaZdtX
14. 'टॉयलेट एक प्रेमकथा'चे संवाद आणि सीन्स 'मानिनी'तून चोरल्याचा आरोप, अक्षय कुमारचा सिनेमा रिलीजपूर्वी वादाच्या भोवऱ्यात https://goo.gl/zfn4cw
15. महिला विश्वचषकात पाकविरुध्दच्या सामन्यात सांगलीची स्मृती मानधना अपयशी; अवघ्या 2 धावांवर बाद, भारताचं पाकसमोर 170 धावांचं आव्हान http://abpmajha.abplive.in
विशेष कार्यक्रम : ‘माझा’ मदतीचा हात, आज रात्री 9.30 वाजता, एबीपी माझावर
बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा
प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर