- नंदुरबार जिल्ह्यात दहावी-बारावीच्या परीक्षेत अनेक केंद्रांवर सामूहिक कॉपी, अक्कलकुव्यातील केंद्राबाहेर चक्क कॉप्यांची विक्री, दृश्यं कॅमेऱ्यात कैद https://goo.gl/FvHmG9
- यापुढे कोणत्याच महापालिकेला कचरा डेपोसाठी जमीन देणार नाही, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, औरंगाबादचा कचराप्रश्न चर्चेने सोडवण्याची तयारी https://goo.gl/j1XbLS
- ‘बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांवर काय कारवाई करणार?’, एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल, तर तथ्यहीन आरोप करुन बदनामी करणाऱ्यांसाठी कायद्याचे नियम तपासू, मुख्यमंत्र्यांचं उत्तर https://goo.gl/biqihv
- छगन भुजबळांना लिलावतीसारख्या खासगी रुग्णालयात उपचाराची परवानगी द्या, राष्ट्रवादीची मागणी, तर सरकारी रुग्णालयांवर अविश्वास का, शिवसेनेचा सवाल https://goo.gl/dxYyFh
- परिचारकांच्या मुद्द्यावरुन विधानसभेत गदारोळ, अंतिम निर्णय होईपर्यंत प्रशांत परिचारकांना सभागृहात प्रवेश नाही, विरोधकांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारचं सावध पाऊल https://goo.gl/zmM5YZ
- फक्त 31 एसटी आगारांसह सर्व बस स्थानकांच्या स्वच्छतेसाठी तब्बल 447 कोटींचं कंत्राट, एसटी महामंडळाचे 1800 सफाई कर्मचारी असूनही खाजगी कंपनीवर स्वच्छतेची जबाबदारी https://goo.gl/dg4tmK
- सोलापूर-धुळे महामार्गाच्या चौपदरीकरणाचं काम पूर्ण होण्याआधीच टोलवसुली सुरु, काम 100 टक्के झाल्यानंतरच टोल सुरु करणार हे नितीन गडकरींचं आश्वासन हवेतच http://abpmajha.abplive.in/
- गुजरातमध्ये 70 जणांना घेऊन निघालेला वऱ्हाडाचा ट्रक नाल्यात कोसळला, भीषण अपघातात 30 जणांचा मृत्यू https://goo.gl/pZExqu
- एकांतात बसलेल्या प्रेमी युगुलावर हल्ला, तरुणावर गोळीबार, तरुणीवर बलात्कार, अंबरनाथमधील कृत्य पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता https://goo.gl/MmjcPJ
- पुण्यात मुठा नदीपात्रात बांधकामाला सरकारची परवानगी, बिल्डर अतुल चोरडियांच्या प्रकल्पाचं काम सुरु, पक्षीजीवन धोक्यात https://goo.gl/MJ1ByJ
- अनेक विद्यार्थी पुनर्मूल्यांकनाच्या पहिल्या यादीत नापास, तर तेच विद्यार्थी दुसऱ्या यादीत पास, मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा आणखी एक घोळ https://goo.gl/HnJDfV
- स्त्री शिक्षणासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना 'भारतरत्न' द्या, खासदार सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी https://goo.gl/fah1x6
- आज आरेची जमीन घेतली, उद्या नॅशनल पार्क मागाल, विकास महत्त्वाचा की पर्यावरण? हायकोर्टाचा मेट्रो प्रशासनाला सवाल https://goo.gl/Zj3Z3Z
- रंगपंचमीनिमित्त विठुरायावर सप्तरंगांची उधळण, तर नाशकात रहाडीतील पारंपरिक रंगोत्सव, सांगलीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक रंगात दंग http://abpmajha.abplive.in
- श्रीलंकेत दहा दिवसांसाठी आणीबाणी लागू, कोलंबोत होणाऱ्या टी-20 तिरंगी मालिकेवर परिणाम नाही, आज भारत वि. श्रीलंका सलामीचा सामना https://goo.gl/4qADJZ
माझा विशेष : लेनिनचा पुतळा पाडल्याने ‘अच्छे दिन’ येतील? विशेष चर्चा, आज रात्री 9 वा. एबीपी माझावर
एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive
@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा