एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/09/2017


1.    सिंचन घोटाळ्याचे गाडीभर पुरावे देणाऱ्या फडणवीसांच्या कारभाराचा भांडाफोड, मराठवाड्यातील 20 बंधाऱ्यांच्या घोटाळ्याचं प्रकरण दडपलं, एबीपी माझाचा एक्स्क्लुझिव्ह रिपोर्ट https://goo.gl/snB7ph

2.    ध्वनी प्रदूषणासंदर्भात मुंबई हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, शांतता क्षेत्रातही लाऊडस्पीकर लावण्याची मुभा goo.gl/wbLcLd

3.    मुंबई-पुण्यासह राज्यभरात गणपती बाप्पाच्या निरोपाची लगबग, कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन करण्याचं आवाहन, कडेकोट बंदोबस्त http://abpmajha.abplive.in

4.    उत्तर कोरियाने आधी जपानवरुन मिसाईल सोडलं, आता हायड्रोजन बॉम्बची चाचणी, जगभरात चिंतेचं वातावरण https://goo.gl/xVgD24

5.    उत्तर कोरियाच्या बॉम्ब चाचणीमुळे सोन्याचे दर गगनाला, 29 हजारावरुन सोनं 30 हजाराच्या घरात, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याला पसंती https://goo.gl/w3DzVM

6.    ब्रिक्स शिखर संमेलनासाठी पंतप्रधान मोदी चीनमध्ये, 'ब्रिक्स'च्या घोषणापत्रात पाकिस्तानवर प्रहार, पहिल्यांदाच 'लष्कर, आणि जैश-ए-तोयबा' या दहशतवादी संघटनांचा उल्लेख https://goo.gl/HwTSjS

7.    जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, सैन्याकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा, शोधमोहीम सुरु http://abpmajha.abplive.in/

8.    एकनाथ खडसेंबाबत राज्य सरकार गप्प का? बेहिशेबी संपत्तीबाबत काय कारवाई केली? मुंबई हायकोर्टाचे राज्य सरकारला सवाल, तीन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश https://goo.gl/EF5nBr

9.    शेतकरी आत्महत्येचा देखावा पाहिला, घरी अनुकरण करताना 13 वर्षांच्या मुलाचा गळफास, साताऱ्यातील धक्कादायक घटना https://goo.gl/9DXLUE

10.    ऐशोआरामात राहणारा बाबा राम रहीम आता रोहतक जेलमध्ये माळी काम करणार, दिवसाची मजुरी 40 रुपये https://goo.gl/yRVbks

11.    मुंबईत मध्य रेल्वेच्या सेवेत लवकरच विस्टाडोम कोचची रेल्वे धावणार; पारदर्शक काचा, फिरत्या खुर्च्यांसह डब्ब्यांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा https://goo.gl/uPPJws

12.    महिलेला 'छम्मकछल्लो' म्हणणाऱ्या व्यक्तीला जेल, ठाण्यातील कोर्टाचा आठ वर्षांनी निकाल https://goo.gl/jwjBB6

13.    अहमदनगरमधील शेती पाहण्यासाठी अंजली तेंडुलकर यांची हजेरी, दुपारचं जेवण शेतकऱ्याच्या घरी https://goo.gl/is5bLf

14.    आयपीएलचे सर्व मीडिया हक्क पुढील पाच वर्षांसाठी स्टार इंडियाकडे, तब्बल 16 हजार 347 कोटींची बोली https://goo.gl/65g4TH

15.    कंगना राणावतच्या आरोपांनंतर सुझान खानकडून हृतिक रोशनची पाठराखण, सज्जन व्यक्तीवर विजय अशक्य, सुझानचं ट्वीट https://goo.gl/qNX6Uv

माझा विशेष : भाऊ कदम आणि गणपती, विशेष चर्चा आज रात्री 9. वाजता, @abpmajhatv वर

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर