एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जुलै 2020 | गुरुवार


1. कोरोना नियंत्रणासाठी लोकप्रतिनिधींनी शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून भूमिका बजावावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्र्यांची चर्चा


2. लवासामध्ये कोविड सेंटर उभारण्याची खासदार गिरिश बापट यांची मागणी, लवासा कंपनीचा मात्र नकार 


3. अमरावतीत कोरोना टेस्टसाठी गुप्तागांतील स्वॅब घेण्याचा संतापजनक प्रकार, आरोपी लॅब टेक्निशियनला अटक, कोरोना टेस्ट सेंटर असलेल्या हॉस्पिटलची संतप्त जमावाकडून तोडफोड 


4. केंद्र सरकारने लागू केलेलं आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण मराठा समाजाला लागू नाही, दुहेरी आरक्षणाचं धोरण नसल्याने महाराष्ट्र सरकारचा निर्णय 


5. केंद्र सरकारपाठोपाठ राज्याच्या अनलॉक गाईडलाईन जारी, मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार इनडोअर जिम आणि व्यायामशाळा मात्र बंदच 


6. अयोध्येत भव्य बौद्धविहार बांधण्याची प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांची मागणी, सर्व आंबेडकरी नेत्यांना एक होण्याचं आवाहन ; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा प्रतिसाद 


7. राममंदिराच्या भूमिपूजनाआधी चिंता वाढवणारी बातमी, अयोध्येतील राम जन्मभूमीचे पुजारी प्रदीप दास यांच्यासह 16 पोलिसांना कोरोनाची लागण


8. राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह सातासमुद्रापार, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकणार भगवान राम, न्यूयॉर्कमधील भारतीयांच्या संघटनेचा उपक्रम


9. चाकणमधील अल्पवयीन मुलीचा खून जवळच्या नातेवाईकानेच केल्याचं पोलीस तपासात उघड, टीव्हीवरील क्राईम शो आणि सिनेमे पाहून पुरावे लपवल्याची कबुली


10. एका दिवसात साडेनऊ कोटी लोकांनी पाहिला सुशांत सिंह राजपूतचा दिल बेचारा, संगीतकार एआर रहमान यांची माहिती.. दोन हजार कोटींचं ओपनिंग झाल्याचा अंदाज


*BLOG* | इतकी कसली घाई आहे?, सौमित्र पोटे यांचा ब्लॉग 


*युट्यूब चॅनल* - https://www.youtube.com/abpmajhatv


*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv


*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha


*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv


*टेलिग्राम* - https://t.me/abpmajhatv


*Android/iOS App ABPLIVE* - https://goo.gl/enxBR