एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 मे 2020 | शनिवार


1.ऑगस्ट महिन्याआधी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करण्याची शक्यता, केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीप सिंह पुरी यांची माहिती 

2. अंतिम वर्षांच्या परीक्षांचा निर्णय राज्यपालांच्या इच्छेनुसारच, खासदार संजय राऊत यांच्याकडून स्पष्ट 

3. मुख्यमंत्री आणि शरद पवार यांच्यात आढावा बैठक, शरद पवार ट्रेनसंदर्भात पुन्हा मागणी करण्यासाठी रेल्वेमंत्र्यांशी बोलत असल्याची मंत्री जयंत पाटील यांची माहिती 

4. देशात 24 तासांत तब्बल 6 हजार 654 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, देशातल्या कोरोना रुग्णांचा आकडा सव्वालाख पार, तर मुंबईसह महाराष्ट्रातही सर्वाधिक वाढ 

5. नागपुरातल्या रामनगर कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिक रस्त्यावर, 14 दिवसांत एकही नवा रूग्ण नसताना कंटेन्मेंट झोनमध्येच ठेवल्यानं संताप

6. मुंबईतील NSCI डोमचं कोविड रुग्णालयात रुपांतर, कोविड रुग्णालयात मोबाईल व्हॅनदेखील उपलब्ध, झेव्हियर्स कॉलेजमध्ये 180 खाटांचं क्वॉरंटाईन सेंटर 

7. वसईहून गोरखपूरसाठी निघालेली श्रमिक ट्रेन चक्क ओडिशाला पोहोचली, मजुरांमध्ये संभ्रमावस्था, माझाच्या बातमीनंतर प्रवाशांच्या मदतीसाठी हालचाली 

8. माजी आमदार हर्षवर्धन जाधवांचा राजकारणातून निवृतीचा निर्णय, उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजनाच्या नावाची घोषणा, निवृत्तीमागचं कारण अस्पष्ट 

9. जे.जे. पोलिस स्टेशनमधील 45 पैकी 18 पोलिस कर्मचाऱ्यांची कोरोनावर मात, कोरोनाला हरवून योद्धे पुन्हा कर्तव्यावर हजर, आणखी 4 पोलिसांचे रिपोर्टही निगेटिव्ह 

10. पुण्यातील प्लाझ्मा थेरपीच्या यशस्वी प्रयोगानंतर ICMR इतर रुग्णालयांना परवानगी देण्याच्या तयारीत

BLOG | 'फुंकर' मनाच्या जखमेवर, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

कोरोना विशेष | केरळमधील कोरोनावर कसा विजय मिळवला? केरळात कोरोनाचा प्रसार रोखणारा मराठमोळा अधिकारी IPS विजय साखरे!

माझा कट्टा | भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर, अभिजीत आणि मनिषा सोनवणे माझा कट्ट्यावर, आज रात्री 9 वाजता

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://goo.gl/enxBRK