एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स |  16 जून 2020 | मंगळवार

1. भारत-चीन सीमेवर झालेल्या झटापटीत भारताचा 1 अधिकारी, 2 जवान शहीद; महिनाभरापासून धुमसत्या वादाचा स्फोट

2. चीनचीही जीवितहानी झाल्याची चीनी प्रसारमाध्यमांची माहिती, भारतीय जवानांनी LAC ओलांडली नसल्याचा भारताचा दावा 

3. भारतातील कोरोना रुग्ण बरं होण्याचा दर 50 टक्क्यांपेक्षा अधिक, पंतप्रधानांची माहिती, इतर देशांच्या तुलनेत परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा

4.सहा जिल्ह्यात झालेल्या सिरो सर्व्हेचा निष्कर्ष, राज्यातील सर्वसामान्य लोकसंख्येमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण अत्यल्प

5. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर, बारामतीत घेतली शरद पवारांची भेट

6. अपूर्ण माहितीच्या आधारे सामनातील अग्रलेख, खाटा कुरकूर करत असल्याच्या टीकेवर थोरातांची नाराजी, काँग्रेस मंत्र्यांना अजूनही मुख्यमंत्र्यांकडून भेटीची वेळ मिळत नसल्याची माहिती

7. चक्रीवादळानं झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रायगडमध्ये, दोन दिवस पाहणी करुन अहवाल देणार, केंद्र सरकारकडून मदतीची अपेक्षा

8. कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव नियंत्रणात, प्रशासनाचे 'मिशन मालेगांव' यशस्वी

9. ब्लड बँकेच्या धर्तीवर प्लाझ्मा बँक तयार करणार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची माहिती

10. अभिनव कश्यपची फेसबूक पोस्ट व्हायरल; सलमान खान आणि यशराज फिल्म्सवर गंभीर आरोप 

BLOG | या काळात 'चांगलं' पण घडतंय!, पत्रकार संतोष आंधळे यांचा ब्लॉग 

BLOG | जबाबदार कोण? : डब्ल्यूएचओ, जागतिकीकरण आणि कोरोना महामारी, प्रा. विनय लाल यांचा ब्लॉग

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv


इन्स्टाग्राम  - https://www.instagram.com/abpmajhatv


फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha


ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv


हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex


Android/iOS App ABPLIVE -  https://g