ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 नोव्हेंबर 2025 | रविवार
1.कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नको, शरद पवारांचा पदाधिकाऱ्यांना आदेश, ओबीसी जागेवर मूळ ओबीसींना प्राधान्य देण्याचे निर्देश https://tinyurl.com/mvxsezt5
2. मंत्री राधाकृष्ण विखेंची गाडी फोडणाऱ्याला एक लाखाचं बक्षीस, माजी आमदार बच्चू कडूंच्या ऑफरनं खळबळ, मुख्यमंत्र्यांनी ही कंसाची औलाद हाकलून लावली पाहिजे, कडूंची मागणी, आधी कर्जबाजारी व्हायचं मग कर्जमाफी मागायची या विखेंच्या वक्तव्यानं कडूंचा संताप https://tinyurl.com/667vzara
3. उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानी ड्रोनच्या घिरट्या, मातोश्रीवर नजर ठेवण्याचा प्रयत्न, विरोधकांचा आरोप, तर पॉडटॅक्सीसाठी MMRDA कडून सर्व्हेक्षण ड्रोनचा वापर, मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण https://tinyurl.com/3cy69ery हा कसला ड्रोन सर्व्हे? फक्त आमचं घर बीकेसीचा भाग आहे का? पोलिसांनी परवानगी दिली होती, तर रहिवाशांना माहिती का दिली नाही? आदित्य ठाकरेंकडून प्रश्नांची सरबत्ती https://tinyurl.com/3beu954p
4. काहीही चुकीचं केलं नाही पुढेही चुकीचं करणार नाही, मुंढवा जमीन प्रकरणावर अजित पवारांकडून पार्थ पवारांची पाठराखण, याआधीही 70 हजार कोटींच्या घोटाळ्याचे आरोप झाले, पण पुढे काहीही आलं नसल्याची आठवण करुन दिली https://tinyurl.com/4ztswyzf जय पवार हे बारामती नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार नाहीत, अजित पवारांचे स्पष्टीकरण https://tinyurl.com/b22rfsyr
5. देवेंद्र फडणवीसांच्या जवळच्या नेत्यांवर कारवाई होत नाही, पण भाजपाला ज्यांचा गेम करायचा त्यांच्यावर सुपरफास्ट कारवाई होते, आमदार रोहित पवारांचा आरोप https://tinyurl.com/2jtjrf2u मुंबई महापालिकेची निवडणूक संपली की भाजप एकनाथ शिंदेंना टार्गेट करणार, अजितदादांच्या मुलाचं प्रकरण बाहेर येताच रोहित पवारांचा मोठा दावा https://tinyurl.com/3xyvmhrb
6. पुणे जिल्ह्यात बिबट्याची दहशत, प्रशासनाच्या अपयशामुळे नागरिकांमध्ये संताप, स्वरक्षणासाठी महिलांना गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालून फिरण्याची वेळ https://tinyurl.com/35e34z95
7. दीड वर्षांच्या चिमुकल्याला विष पाजून आईने आयुष्य संपवलं, बार्शीतील घटनेने खळबळ https://tinyurl.com/3hv65bzk दृश्यम बघून कट रचला, बायकोला संपवलं, भट्टीत जळलं अन् राख पाण्यात सोडली; पुण्याच्या शिक्षिकेसोबत नवऱ्याचं भयंकर कृत्य https://tinyurl.com/mrxxbcsy
8. घरात दोघे भाऊ, वय वाढलेलं, लग्न जुळत नसल्याच्या संताप अन् मुलाचा बापासोबत वाद, मुलाने वडिलाच्या डोक्यात वीट घालून हत्या केली, भंडाऱ्यातील धक्कादायक घटना https://tinyurl.com/bdfbjfn9 नंदुरबारमध्ये देवगोई घाट परिसरात स्कूल बसचा भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर अनेकजण जखमी, अपघातग्रस्त बसमध्ये 30 ते 35 विद्यार्थी असल्याची माहिती https://tinyurl.com/h7mz896t
9. माझ्या हायड्रोजन बॉम्बवर निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? आरोप खरे आहेत, म्हणून बोलती त्यांची बंद, हे मत चोर आहेत, काँग्रेस नेते राहुल गांधींचा हल्लाबोल https://tinyurl.com/33z5ezza
10. टीम इंडियाला मिळाली नवी DSP, मोहम्मद सिराज-दीप्ती शर्मानंतर ऋचा घोषही पोलिसांच्या वर्दीत दिसणार, पश्चिम बंगाल सरकारकडून पोलीस उपअधीक्षक पदावर नियुक्ती https://tinyurl.com/ycyabfxn
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w