1. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना 25 मार्चपर्यंत एनआयएची कोठडी, स्फोटकं सापडण्यामागे मोठं षडयंत्र असल्याची एनआयएची कोर्टात माहितीhttps://bit.ly/3eyV7Mp 

2. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर दिसलेली इनोव्हा कार एनआयएच्या ताब्यात, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून कारचा वापर होत असल्याची सूत्रांची माहितीhttps://bit.ly/30K5kgG 

3. सचिन वाझे यांना गोवण्यात आलं आहे, बंधू सुधर्म वाझे यांचा दावा, पत्नी आणि कुटुंबाला अटकेबाबत कळवलं नसल्याची माहितीhttps://bit.ly/2NhHl5B 

4.  एकच भाग बाहेर आला आहे, दुसरा भाग अत्यंत महत्वाचा आहे, स्फोटक प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांचं सूचक वक्तव्य https://bit.ly/3rQaEv8 तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यामातून राज्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न, शिवसेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया https://bit.ly/3eGsjl1 

5. योग्य तपास केला तर महाराष्ट्रातील सरकार कोसळेल, सचिन वाझे यांच्या अटकेवर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतचं भाकित https://bit.ly/3vqdusH 

6. अभिनेता सुशांतसिंग राजपूत प्रकरणावर भाजपने एक निवडणूक काढली, त्यामुळे आता सचिन वाझे प्रकरणी तरी मुळापर्यंत जा, भाई जगताप यांचा भाजपला सल्ला https://bit.ly/38CTjhC  तर अंबानी कुटुंबासाठी भाजपने महाराष्ट्राच्या विधानसभेचा दुरुपयोग केला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप https://bit.ly/3rYA0GU 

7. रेखा जरे हत्येप्रकरणी पत्रकार बाळ बोठे यांना अटक, अटककेवेळी बाळ बोठे यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट, अहमदनगर पोलिसांची माहिती https://bit.ly/3rMvGL0  तर पत्रकार बाळ बोठे यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी https://bit.ly/2ON9nWW 

8. आसाम वगळता इतर राज्यात भाजपचा पराभव होईल, हा ट्रेंड; पाच राज्यांतील निवडणुकांवर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांचं मोठं वक्तव्य https://bit.ly/3qIzVG1  

9. अक्षयकुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट सूर्यवंशीच्या प्रदर्शनाची तारिख ठरली, 30 एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार चित्रपट https://bit.ly/3tfuYpS 

10. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसरा टी20 सामना आज, विजयाच्या निर्धारानं टीम इंडिया मैदानात उतरणार, तर टी20 मालिकेतील दुसरा सामना खिशात घालण्यासाठी इंग्लंडचा प्रयत्नhttps://bit.ly/3bKPQQ3 

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv             

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv            

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha            

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv            

टेलिग्राम - https://t.me/abpmajhatv