1. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात निवडणुकीची धामधूम, आज मुंबईत पंतप्रधा नरेंद्र मोदी तर संगमनेरमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची प्रचारसभा


 

  1. नरेंद्र मोदींचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरे वाराणसीत, प्रकाशसिंह बादलांसह नितीश कुमार यांचीही हजेरी


 

  1. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होऊनही राहुल गांधी आणि शरद पवार यांची महाराष्ट्रात एकही सभा एकत्र नाही, राजकीय वर्तुळांमध्ये चर्चांना उधाण


 

  1. राधाकृष्ण विखे-पाटील यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा स्वीकारला, विखे आज अंतिम निर्णय जाहीर करण्याची शक्यता


 

  1. अक्षय कुमारने विचारलेल्या आंब्याच्या प्रश्नावरुन राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला, सत्तेसाठी शिवसेना लाचार झाल्याचाही पुनर्रुच्चार




  1. प्रचाराच्या रणधुमाळीत जगण्यामरण्याचे प्रश्न दुर्लक्षित, त्र्यंबकेश्वरमधील बर्ड्याच्यावाडीत हंडाभर पाण्यासाठी महिलांचा जीवघेणा प्रवास


 

  1. सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार-हत्या प्रकरणातील नराधमाची फाशी हायकोर्टाकडून रद्द, कायदेशीर त्रुटींचा फायदा, ठाणे सत्र न्यायालयाला पुन्हा खटला चालवण्याचे आदेश


 

  1. सरन्यायाधीशांविरोधातल्या षडयंत्राच्या दाव्याची चौकशी निवृत्त न्यायमूर्ती ए के पटनायक करणार, सीबीआय, आयबी, दिल्ली पोलिसांना सहकार्याचे कोर्टाचे आदेश


 

  1. लातूर बस स्थानकात गोळीबाराचा थरार, गोळी झाडताना हल्लेखोरच जखमी, बस स्थानकाला पोलीस छावणीचं रुप


 

  1. राजस्थान रॉयल्सचा कोलकाता नाईट राईडर्सवर तीन विकेटसनी विजय, राजस्थानचा आयपीएलमधला चौथा विजय