1.  हवामान विभागाकडून पश्चिम महाराष्ट्रात येत्या 48 तासात अतिवृष्टीचा इशारा, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरमधे रेड अलर्ट जारी

1. सांगलीत कृष्णा नदीच्या पातळीत कालच्या तुलनेत वाढ, पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात, नागरिकांना स्थलांतरित करण्याचं आव्हान

3. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पातळी दोन फुटांनी घटली, मदतकार्यात वेग, पण येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा

4. राज्यात महापुरामुळे आतापर्यंत 28 जणांचा बळी, मुख्यमंत्र्यांकडून मदतीचं आश्वासन, 'एबीपी माझा'च्या आवाहनानंतर राजकीया यात्रा रद्द

5. राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मराठी चित्रपटसृष्टी सरसावली, सुबोध भावे, रवी जाधव, भाऊ कदम, मंगेश देसाईचा पुढाकार

6. सांगली आणि कोल्हापुरातील महापुराचा फटका मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्याला, वाशीच्या एपीएमसीमध्ये भाजीपाल्याची आवक घटली

7. भारतातील 19 विमानतळांवर हायअलर्ट जाहीर, मुंबईसह दिल्ली, हैदराबाद, अमृतसर, लखनऊ विमानतळांवर कडेकोट सुरक्षा

8. कलम 370 रद्द केल्याने काश्मीरचा विकास होईल, पंतप्रधान मोदींचं देशाला संबोधन, योग्य वेळी काश्मीरमध्ये निवडणुका घेण्याचेही सुतोवाच

9. सोन्याला पुन्हा एकदा ऐतिहासिक झळाली, प्रतितोळा 38 हजार रुपयांवर दर, रुपयाची घसरण आणि अमेरिका-चीनमधील तणावाचा फटका

10. दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमलाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, ट्विटरवरुन घोषणा, मात्र देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळणार