स्मार्ट बुलेटिन | 9 एप्रिल 2020 | गुरुवार | एबीपी माझा

कोरोनाबाधितांचा मृत्यूदर महाराष्ट्रात सर्वाधिक,  देशपातळीवर चिंतेचा विषय

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1135, काल दिवसभरात 117 नव्या रूग्णांची भर

पुण्यात चोवीस तासात कोरोनाबाधित 10 रूग्णांचा मृत्यू, तर नाशिकमध्ये कोरोनाचा पहिला बळी

लॉकडाऊन संपल्यानंतरचं रेल्वेचं नियोजन ठरलं, कोरोनाचे तीन झोन तयार करुन सेवा सुरु करणार असल्याची माहिती

खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाच्या टेस्ट मोफत करा, सुप्रीम कोर्टाचे आदेश

धारावीतील सर्व कोरोनाबाधितांचं निजामुद्दीन मरकज कनेक्शन समोर, धारावीत आतापर्यंत दोघांचा कोरोनामुळे मृत्यू

लातूरकरांना दिलासा, आठ कोरोनाबाधितांपैकी दुसऱ्या तपासणीत तिघांचे रिपोर्ट निगेटिव्ह

विरोधी पक्ष नेत्यांसोबतच्या बैठकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत, सूत्रांची माहिती

हायड्रॉक्सिक्लोरोक्वीनच्या पुरवठ्यानंतर ट्रम्प यांचा सूर बदलला,  पंतप्रधान मोदींचे आभार मानले

जगभरात कोरोनाचा कहर, मृतांचा आकडा 88 हजार पार, तर कोरोनाबाधितांची संख्या 15 लाखांहून अधिक