देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. येस बँक गैरव्यवहार प्रकरणी अखेर राणा कपूर यांना अटक, ईडीकडून 31 तास चौकशी, येस बँकेमुळे राज्यातल्या तब्बल 109 बँकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प

2. येस बँकेवरील निर्बंधांमुळे सहकारी बँकांचे व्यवहार ठप्प, महाविकास आघाडी सरकारच्या महत्त्वाकांक्षी कर्जमाफी योजनेलाही खीळ

3. भाजप म्हणजे हिंदुत्त्व नाही, अयोध्यावारीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे टीकेचे बाण, राम मंदिरनिर्मितीसाठी एक कोटीच्या मदतीची घोषणा

4. गणेश नाईक नवी मुंबईतील सर्वात मोठे खंडणीखोर, नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांची गंभीर टीका

5. महाविकास आघाडी सरकार लवकरच शिक्षकांची मेगाभरती करणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या आश्वासनानंतर डीएड, बीएड धारक विद्यार्थ्यांचं आंदोलन मागे


6. भारतातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या 34 वर, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपाययोजनेसंदर्भात महत्त्वाच्या सूचना, तर भिवंडीत मास्क विक्रीचा विचित्र प्रकार उघड

7. विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात मुलींचा जन्मदर घसरला, मुलींच्या जन्मदारात दर हजारी तब्बल 23 ने घसरणं

8. विरारमध्ये महिला पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, गोळीबारात एपीआय सिद्धवा जायभाये थोडक्यात बचावल्या, आरोपी फरार

9. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, भारतीय कापूस प्राधिकरणाच्या इतिहासात प्रथमच सात महिने कापूस खरेदी केंद्र सुरू राहणार

10. हरमनप्रीत कौरच्या भारतीय संघाला महिलादिनी नवा इतिहास घडवण्याची संधी, टी-20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये आज भारताचा ऑस्ट्रेलियाशी मुकाबला