स्मार्ट बुलेटिन | 08 एप्रिल 2019 | सोमवार | एबीपी माझा

1. बहुमताच्या परीक्षेत भाजप काठावर पास होण्याची शक्यता, एबीपी-सीव्होटरचा ओपिनियन पोल, देशभरात भाजपच्या 51 जागा घटण्याची तर काँग्रेसच्या 47 जागा वाढण्याची शक्यता

2. मागील 'पोल'च्या तुलनेत महाराष्ट्रात महायुतीला 2 जागांचा फटका बसणार, एबीपी-सीव्होटरचा ओपिनियन पोल

3. भाजपकडून मध्यमवर्गीय कार्ड खेळण्याची तयारी, काँग्रेसच्या न्याय योजनेला टक्कर देण्यासाठी भाजपचा जाहीरनामा, सकाळी 11 वाजता प्रकाशन

4. आयकर विभाग माझ्या घरावर धाड मारणार आहे, केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम यांचा दावा, सरकारच्या सांगण्यावरुन कारवाई होत असल्याचा आरोप

5. सभेच्या ठिकाणी रिकाम्या खुर्च्यांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरला काँग्रेस कार्यकर्त्यांची मारहाण, तामिळनाडूतल्या विरुधुनगर जिल्ह्यातील घडना, व्हिडीओ व्हायरल



6. एऩडीएत 36 तर महाआघाडीत 26 पक्ष, भेसळ कुठे आहे हे जनतेनंच ठऱवावं, दौंडमधल्या कार्यक्रमात शरद पवारांचं जनतेला आवाहन

7. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यास सरकार जागेवर नाही, ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा सामनातून पुन्हा घरचा आहेर

8. मनसेला झिडकारणाऱ्या काँग्रेसचा राज ठाकरेंना एवढा पुळका का,सेना-भाजप नेत्यांचा सवाल, राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्याच्या आवाहनावर सडकून टीका

9.हिंदू धर्मासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उर्मिला मातोंडकरविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार, तर ब्राह्मणांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राजू शेट्टींवर गुन्हा दाखल

10.विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा पराभवाचा षटकार, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध बंगळुरु चार विकेट्नी पराभूत, लाजिरवाण्या विक्रमाशी बरोबरी