स्मार्ट बुलेटिन | 7 मे 2020 | गुरुवार | एबीपी माझा


बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोना वॉरियर्सचा सन्मान, पंतप्रधान मोदींकडून बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा, जनतेशी साधला संवाद


परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्याच्या अभियानाला आजपासून सुरुवात, 14 हजारांपेक्षा जास्त लोकांना मायदेशी आणणार

आगामी काळात सार्वजनिक वाहतूक सुविधा सुरु करण्याचा विचार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

मुंबई महापालिका क्षेत्रात इलेक्ट्रॉनिक, हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी, आयुक्तांकडून निर्देशात बदल



मुंबईतील जेजे पोलीस स्टेशनमधील 28 पोलिसांना कोरोनाची लागण तर राज्यभरात एकूण 456 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कोरोनाबाधित

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना घरी पोहचवण्यासाठी 'लालपरी' धावणार, आराखड्याचे काम सुरू असल्याची मंत्री अनिल परब यांची माहिती

कोविड चाचणी निगेटिव्ह आलेली असतानाही क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्याची गरज काय?, हायकोर्टाचा सवाल

औरंगाबादमध्ये 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या 373 वर

भारतात कोरोना रॅपिड टेस्ट स्ट्रिप विकसित, मे महिन्याच्या अखेरीस किट वापरण्याकरता उपलब्ध होईल, सीएसआयआरची माहिती

जगभरातील 212 देशांमध्ये कोरोनाचा कहर! गेल्या 24 तासांत 94,261 नव्या रुग्णांची वाढ