- लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकाच आठवड्यात दुसऱ्यांदा मंत्रिमंडळ बैठक, विक्रमी 50 निर्णय होण्याची शक्यता
- सत्तेला चिकटून राहणारे उद्धव ठाकरे हेच खरे ठाकरे, माझाच्या तोंडी परीक्षेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचं वक्तव्य
- अहमदनगरच्या जागेचा तिढा आज सुटण्याची शक्यता, राष्ट्रवादीच्या बैठकीत सुजय विखे-पाटलांच्या जागेबाबत शरद पवार निर्णय घेणार
- लोकसभेसाठी युतीच्या वादग्रस्त जागांचा तिढा सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आज मातोश्रीवर, खोतकर वाद आणि सोमय्यांच्या विरोधावर चर्चा
- नागपूर मेट्रोचं आज पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, एअरपोर्ट साऊथ स्टेशनवर उद्घाटन सोहळा, मुख्यमंत्री, गडकरी उपस्थिती लावणार
- राज्यातल्या 382 शहरांसह त्यालगतच्या शासकीय जमिनीवरची अतिक्रमणे नियमित, सर्वांसाठी घर योजनेअंतर्गत सरकारचा मोठा निर्णय
- तारापूर आणि बीएआरसीमधील अणुऊर्जा प्रकल्प बंद करा, पालघरमधील भूकंपांच्या घटनांनंतर अभियांत्रिकी विद्यार्थ्याची मुंबई उच्च न्यायालयात याचिका
- पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसच्या वाटेवर, गुजरातमधील जामनगरमधून निवडणूक लढवण्याची चिन्हं
- अयोध्याप्रकरणी निकाल सुप्रीम कोर्टानं राखून ठेवला, निर्मोही आखाडा, वक्फ मध्यस्थीसाठी अनुकूल, रामलल्ला समितीचा मात्र विरोध, 14 मार्चला पुढील सुनावणी
- जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानींची मोठी झेप, फोर्ब्सच्या यादीत अंबानी 19 व्या क्रमांकावरुन 13 व्या क्रमांकावर