देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. दिवाळीसाठी राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जाहीर, फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन, मुंबईत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास मनाई


2. राज्यातील बारावीपर्यंतच्या शाळांना 12 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत दिवाळीची सुट्टी, शालेय शिक्षण विभागाचं परिपत्रक, शिक्षकांमध्ये मात्र नाराजी

3. रँगिंग करणार नाही, असं विद्यार्थी आणि पालकांकडून लिहून घ्या; यूजीसीचे सर्व विद्यापीठं आणि महाविद्यालयांना निर्देश

4. अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या सोमवारपासून पैसे जमा होणार, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती, दिवाळीपूर्वी पैसे देण्याचं आश्वासन

5. दिवाळीच्या तोंडावर सिडको प्रशासनाकडून गुडन्यूज, गृहनोंदणीसाठी अवघे 1 हजार मुंद्रांक शुल्क, लॉटरी विजेत्या साडेचौदा हजार जणांना फायदा होणार

पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 06 नोव्हेंबर 2020 | शुक्रवार | ABP Majha



6. लवकरच व्हॉट्सअॅपवरून आर्थिक व्यवहार शक्य, यूपीआय पेमेंटसाठी व्हॉट्सअॅपला NPCI ची परवानगी, व्हॉट्सअॅप कोणते फिचर्स देणार याकडे लक्ष

7. तुळजापूर मंदिर परिसरात जमावबंदी लागू, भाजप आध्यात्मिक आघाडीच्या आंदोलनाचा मंडप प्रशासनानं काढला, तर आंदोलन सुरुच ठेवण्याचा भाजपचा निर्धार

8. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांवर जीवघेणा हल्ला, कारवाई टाळण्यासाठी पोलिसालाच बोनेटवर घेऊन गाडी पळवली, आरोपी ताब्यात

9. कोलकात्यात सर्वसामान्यांसाठी 11 नोव्हेंबरपासून लोकल सेवा सुरु, पियूष गोयल यांची माहिती, 50 टक्के आसनक्षमतेनं प्रवास करता येणार

10. मुंबई इंडियन्स सहाव्यांदा आयपीएलच्या फायनलमध्ये; क्वालिफायरमध्ये मुंबईची दिल्लीवर 57 धावांनी मात, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट प्रभावी