- रायगडावर आज 346 व्या शिवराज्याभिषेक दिनाचा उत्साह, ढोल ताशांच्या गजरात शिवरायांना मानवंदना, सकाळी 10 वाजता सुवर्ण अभिषेक
- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्र्यांनी कंबर कसली, लोकसभा निवडणुकीत ज्या भागात भाजपला कमी मतं पडली त्याठिकाणी भाजपकडून लक्ष केंद्रित
- नवनिर्वाचित खासदारांसह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अंबाबाईच्या चरणी, 15 जूनला अयोध्येला जाऊन रामलल्लाचंही दर्शन घेणार
- राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची आज दिल्लीत ईडीकडून चौकशी, कथित एव्हिएशन घोटाळ्याप्रकरणी पटेलांना समन्स
- सुमित्रा महाजनांकडे महाराष्ट्राचं राज्यपालपद सोपवलं जाण्याची चर्चा, भाजपकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा नाही
- जम्मू काश्मीरमध्ये हिंदू मुख्यमंत्री बनवण्याच्या भाजपच्या हालचालींची चर्चा, अमित शाह विधानसभा मतदारसंघाची फेररचना करणार असल्याची माहिती
- मान्सून 8 जून रोजी केरळात दाखल होणार, कोकणातही 10 जूनला आगमन, हिंगोली, सिंधुदुर्गात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी
- लग्नानंतर तळहातावरची मेहंदी सुकत नाही, तोच 19 वर्षीय नवविवाहितेचा करुण अंत, लग्नानंतर अवघ्या बारा दिवसात नवविवाहितेचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
- पुण्यातील कोथरुड पोलिस ठाण्याच्या मुद्देमाल कक्षात मानवी सांगाडा सापडला, हत्या झालेल्या तरुणाच्या सांगाड्यावर तब्बल 17 वर्षांनी अंत्यसंस्कार
- दक्षिण आफ्रिकेला हरवून टीम इंडियाची विश्वचषकात विजयी सलामी, रोहित शर्माचं नाबाद शतक, चहलच्या चार विकेट्स भारताच्या विजयात मोलाच्या