स्मार्ट बुलेटिन | 6 ऑगस्ट 2020 | गुरुवार | एबीपी माझा
मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण, मुंबईसह उपनगरात येत्या 24 तासात मुसळधार पावसाचा इशारा अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन तर पंतप्रधानांकडून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन कोल्हापुरात पंचगंगा नदीची धोकापातळीकडे वाटचाल, धोक्याची पातळी गाठण्यासाठी केवळ दोन फूट बाकी रत्नागिरीतील जगबुडी आणि वाशिष्टी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
अयोध्येतल्या राममंदिराचं खरं श्रेय हिंदू महासभेचंच! भाजपने विश्वासघात केल्याची हिंदू महासभेची आगपाखड राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह सातासमुद्रापार, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले भगवान राम आणि राममंदिराचे फोटो गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी नियमावली जाहीर, 10 दिवस क्वॉरंटाईन राहावं लागणार कोरोनामुळे पतीचे निधन, पत्नीने जुळ्या मुलांसह स्वत:च्या नसा कापल्या, मायलेकीचा मृत्यू, मुलगा बचावला, औरंगामधील घटना आदित्य ठाकरेंविरोधात कारस्थान करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, संजय राऊतांचा इशारा सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत होणार, बिहार सरकारची शिफारस केंद्राकडून मान्य