देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला मोठा धक्का! विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण


 

  1. कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत काल दिवसभरात 19 हजार 218 रुग्णांची विक्रमी वाढ, कोरोनाच्या ग्रामीण भागातील प्रादुर्भावात वाढ


 

  1. अंतिम वर्षाची परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची, 50 मार्क इंटर्नलला, उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांची माहिती, कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय


 

  1. सीईटीसाठी अर्ज करण्याची शेवटची संधी, विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 7 ते 8 सप्टेंबरपर्यंतची वेळ; सीईटी सेलकडून विद्यार्थ्यांना मुदतवाढ


 

  1. डहाणू, तलासरी पुन्हा भूकंपाने हादरले, 3.6, 2.8 आणि 4.0 रिश्टर स्केल क्षमतेचे लागोपाठ तीन भूकंप; कोरोनासोबत दुहेरी संकटाने नागरिक भयभीत


 

  1. महान वडिलांचे पुत्र असणं एवढंच कर्तृत्व असू शकत नाही, नाव न घेता अभिनेत्री कंगना रनौतचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा


 

  1. शिवसेनेच्या रणरागीणी कंगनाचं थोबाड फोडतील, आमदार प्रताप सरनाईक यांचं वक्तव्य तर सरनाईकांना अटक करण्याची राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षांची मागणी


 

  1. लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; रामदास आठवले, अमृता फडणवीस यांच्याकडून कंगनाची पाठराखण


 

  1. सुशांत ड्रग्जप्रकरणी आता रियाचा भाऊ रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा यांना अटक, रियासाठी ड्रग्ज मागवत असल्याची कबुली


 

  1. प्रादेशिक शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करणे महत्वपूर्ण; शांघाई सहकार्य संघटनेच्या परिषदेत बोलताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचा चीनला इशारा