1. काँग्रेसचा जाहीरनामा निराशजनक, काँग्रेसचा निवडणुकीतील आश्वासनांचा ट्रॅक रेकॉर्ड खराब, एबीपी न्यूजच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची काँग्रेसवर टीका
 
  1. चौकीदाराची चौकशी करून तुरूंगात टाकणार, नागपुरातल्या सभेत राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, आज चंद्रपूर आणि वर्ध्यात सभा
 
  1. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडे 15 कोटींची संपत्ती, उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दिली माहिती
 
  1. भाजपच्या विचारधारेशी असहमती म्हणजे देशविरोध नव्हे, ब्लॉगच्या माध्यमातून अडवाणींनी सोडलं मौन, भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्याची चर्चा
 
  1. महाआघाडीत मनसेला नाकारणाऱ्या काँग्रेसकडूनच राज ठाकरेंच्या सभेचा आग्रह, माझाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं वक्तव्य
VIDEO | स्मार्ट बुलेटिन | 5 एप्रिल 2019 | शुक्रवार | एबीपी माझा
  1. निवडणूक आयोगाला तुरूंगात टाकण्याची भाषा करणाऱ्या प्रकाश आंबेडकरांविरोधात गुन्हा दाखल, यवतमाळच्या सभेतील वक्तव्य भोवण्याची शक्यता
 
  1. मी माढ्यातून लढणार नव्हतो, तसा माझा विचार नव्हता, विजयसिंह मोहितेंना लढवायचं होतं, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार पवार यांचं स्पष्टीकरण
 
  1. काँग्रेसच्या एखाद्या नेत्याला रॉकेटसोबत बांधून बालाकोटमध्ये पाठवलं असतं, बालाकोटवर प्रश्नचिन्ह उपस्थीत करणाऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांचा टोला
 
  1. मुंबई सीएसएमटीतील हिमालय पुलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटकडे दुर्लक्ष, पालिका प्रशासनाची 'स्थायी'मध्ये कबुली
 
  1. सनरायझर्स हैदराबादचा दिल्ली कॅपिटल्सवर पाच विकेटसनी विजय, जॉनी बेअरस्टोची 48 धावांची निर्णायक खेळी