स्मार्ट बुलेटिन | 4 जून 2020 | गुरुवार | एबीपी माझा

राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर 7 वरुन 4.15 टक्क्यांवर, काल 122 जणांचा मृत्यू

जीवनावश्यक वस्तूंच्या कायद्यात बदल, कांद्यासह अनेक शेतमालावर सरकारी नियंत्रण नाही; केंद्र सरकारचा निर्णय

'निसर्ग' चक्रीवादळाचा तडाखा, अनेक ठिकाणी उन्मळले वृक्ष, घरांची पडझड, पुण्यात दोघांचा मृत्यू, महावितरणचं मोठं नुकसान, दुरुस्तीचे काम सुरु

निसर्ग चक्रीवादळ गेल्यानंतर मुंबईमध्ये वातावरण शांत, पाऊसही पूर्णपणे थांबला



चक्रीवादळाचा प्रवास उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने, नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी, धुळ्यातही पाऊस

फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्ल्याने हत्तीणीचा मृत्यू; रतन टाटांकडून रोष व्यक्त तर गुन्हेगारांना शोधण्याची अनुष्का शर्माची केरळच्या मुख्यमंत्र्यांना विनंती

उद्धव ठाकरे लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत, आयएएनएस आणि सी व्होटर्सचा सर्व्हे

बॉम्बे हायकोर्टाचे नाव बदलून महाराष्ट्र उच्च न्यायालय करा, सर्वोच्च न्यायालयात याचिका

अमेरिका आणि चीनमधील विमानसेवा बंद, डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय

जगभरात 65 लाखांहून अधिक कोरोनाबाधित, मागील 24 तासात 1.21 लाख नवीन रुग्ण तर 5 हजार मृत्यू