1. जीडीपी 5 टक्क्यांवर आल्याने देशाच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त धक्का, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत विकास दरात मोठी घसरण, 10 सरकारी बँकांचं विलिनीकरण होणार
2. पद्मसिंह पाटलांच्या पक्षांतरावरील प्रश्नावर शरद पवार संतापले, राजकारणात नातेवाईकांचा काय संबंध, पवारांचा पत्रकारांना प्रतिसवाल
3. नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाचं भवितव्य अधांतरित, विलिनीकरणाचा निर्णय शिवसेनेला विश्वासात घेऊनच, एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत मुख्यमंत्र्यांचे संकेत
4. गणेशोत्सवानंतर आचारसहिंता,15 ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी मतदान, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती
5. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची आज शेवटची तारीख, सोशल मीडियावरील वाढीव तारखेचा दावा केवळ अफवा, आयकर विभागाची माहिती
6. पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘चौकीदार चोर है’, म्हणणाऱ्या राहुल गांधींना नोटीस, 3 ऑक्टोबरला गिरगाव कोर्टात हजर राहण्याचे समन्स जारी
7. राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार सोहळा संपन्न, ज्येष्ठ पार्श्वगायक सुरेश वाडकरांसह दिग्गजांचा गौरव, पुरस्कार सोहळ्याकडे शिवसेनेच्या नेत्यांनी पाठ
8. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांची ट्रॅव्हल्सवाल्यांकडून लूट, गर्दीचा फायदा घेत तिप्पट भाडे आकारणी, रेल्वेचं वेळापत्रक बिघडल्याने प्रवाशांना ताप
9. नाशिकमध्ये बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचं विघ्न, शहरातील बहुतांश रस्त्यांची चाळण, 16 हजार खड्डे बुजवल्याचा प्रशासनाचा दावा
10. दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर भारताच्या 5 बाद 264 धावा, मयांक अग्रवाल आणि कर्णधार विराट कोहलीने भारताच्या डावाला सावरलं