देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. भारतात उद्या कोरोना लसीची घोषणा होण्याची शक्यता, सीरम आणि बायोटेकच्या अहवालाचा तज्ज्ञ समिती आढावा घेणार


2. आजपासून रेल्वे तिकीटांची सुपरफास्ट बुकिंग, एका मिनिटात दहा हजार तिकीटांची बुकिंग शक्य, रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते आज आयआरसीटीसीच्या नव्या वेबसाईटचं उद्घाटन


3. मुंबईत सार्वजनिक ठिकाणी चारपेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी, थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर डीजे पार्टीवरही निर्बंध, महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी


4. उद्यापासून मोबाईल नंबरआधी शून्य लावावा लागणार, तर 50 हजारांपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पेमेंट सिस्टिम लागू होणार


5. बलात्काराच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेला राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल, कारवाईसाठी भाजप आक्रमक, काल ठिकठिकाणी आंदोलनं


6. मुंबईहून कणकवणीच्या दिशेने निघाली बस कशेडी घाटात कोसळली, अनेक जण जखमी, घटनास्थळी ग्रामस्थांची मदतीसाठी धाव


7. कोरोनाचा नवा स्ट्रेन अतिशय संसर्गजन्य आणि वेगाने पसरतो, एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती, खबरदारी घेण्याचं आवाहन


8. एपीएससीसाठी नवा नियम, खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सहा संधी, मागास प्रवर्गासाठी नऊ तर अनुसूचित-जाती जमातींसाठी संधीची मर्यादा नाही


9. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली, विभागीय आयुक्तांकडून सामान्य प्रशासन विभागाला प्रस्ताव


10. सातव्या बैठकीनंतरही शेतकरी आंदोलनावर तोडगा नाहीच, मात्र सकारात्मक चर्चा झाल्याचा केंद्रीय कृषीमंत्र्यांचा दावा, 4 जानेवारीला पुन्हा बैठक