राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये

1. युतीच्या घोषणेपूर्वीच शिवसेना-भाजपला एबी फॉर्म वाटण्याची घाई, शिवसेनेकडून 14 इच्छुकांना एबी फॉर्म, तर पहिली यादी जाहीर होताच भाजपही एबी फॉर्म वाटणार

2. शिवसेनेच्या पहिल्या संभाव्य यादीत आदित्य ठाकरेंचं नाव, वरळीमधून उमेदवारी जवळपास निश्चित, विश्वनाथ महाडेश्वर, दीपक केसरकर, भास्कर जाधवांचही नाव

3. काँग्रेसकडून पहिल्या 51 उमेदवारांच्या यादीत दिग्गजांना स्थान, बाळासाहेब थोरात, अमित देशमुख, प्रणिती शिंदेंची उमेदवारी कायम, भोकरमधून अशोक चव्हाणांना संधी

4. भारत भालके, सिद्धराम मेहेत्रेंसह काँग्रेसच्या 6 आमदारांचा भाजपमध्ये प्रवेश, गोपीचंद पडळकरही भाजपवासी होणार, नारायण राणेंच्या भाजपप्रवेशासाठी गांधी जयंतीच्या मुहूर्ताची चर्चा

5. राज ठाकरेंची मनसे विधानसभा निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती, मुंबईतल्या वांद्र्यात आज इच्छुक उमेदवारांचा मेळावा


6. गोपिचंद पडळकरांचा आज भाजप प्रवेश निश्चित, पडळकर अजित पवार यांच्याविरोधात बारामतीतून निवडणूक लढण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

7. उदयनराजे भोसले सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी तर शिवेंद्रराजे विधानसभेसाठी उद्या उमेदवारी अर्ज भरणार, उदयनराजेंची ट्विटरवरून घोषणा

8. जम्मू-काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही सर्वात मोठी चूक,  कलम 370 वरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची बोचरी टीका

9. पैठणच्या तहसीलदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक, राष्ट्रपतींच्या हस्ते झाला होता सन्मान

10. ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचं वयाच्या 78 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन, सिनेसृष्टीवर शोककळा, 300 हून अधिक सिनेमात साकारल्या होत्या विविध भूमिका