देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. अमेरिकेकडून जागतिक आरोग्य संघटनेशी संबंध तोडल्याची घोषणा, डब्लूएचओ चीनच्या कलाने काम करत असल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा आरोप


 

  1. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्याबाबत आज निर्णयाची शक्यता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यात चर्चा; तर राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत


 

  1. कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी महाराष्ट्रात उच्चांक गाठला, दिवसभरात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज


 

  1. विद्यापीठ परीक्षांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व कुलगुरुंशी चर्चा करणार, अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत आज निर्णय होण्याची शक्यता


 

  1. कोरोनाशीसंबंधीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचा निर्णय


 

  1. राज्यातील 50 हजार परिचारिका बेरोजगार, आधी त्यांना काम द्या, राज्य सरकारच्या केरळकडे परिचारिका मागणीवरून परिचारिका संघटना आक्रमक


 

  1. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, डॉक्टरांसाठी मुंबईत लोकल सेवा सुरू करण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार


 

  1. यंदा पायी दिंडी सोहळा रद्द! वारकरी संप्रदाय अन् उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत निर्णय, माऊली आणि तुकोबांच्या पादुका हेलिकॉप्टर किंवा वाहनानं पंढरीला नेणार


 

  1. कल्याणमध्ये रोबोट करणार कोरोना बाधित रुग्णांची शुश्रूषा!,कोरोना संसर्गापासून आरोग्य कर्मचाऱ्यांचा बचाव होण्यास मदत होणार


 

  1. जिल्हा पातळीवर कोविड टेस्टिंग लॅब उभारण्याची गरज नाही, राज्य सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची नाराजी