देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. भारत सरकारचा चीनला ऑनलाईन दणका; टिकटॉक, यूसी ब्राऊजर, शेअर इटसह 59 अॅप्सवर बंदी
2. पंतप्रधान मोदी आज दुपारी चार वाजता देशाला संबोधित करणार, कोरोना संकट आणि भारत-चीन तणाव मुद्द्यावर बोलण्याची शक्यता
3. राज्यात मिशन बिगिन अनेगचा दुसरा टप्पा 31 जुलैपर्यंत वाढवला, जूनमधलेच निर्बंध कायम राहणार, नवे नियम नाहीत
4. मुंबई महानगर क्षेत्रात प्रवासावर निर्बंध, ठाण्यातील लॉकडाऊनबाबत मात्र संभ्रमावस्था, नवी मुंबई 44 कंटेन्मेंट झोनमध्ये कडक नियम
5. राज्यात सलग चौथ्या दिवशी पाच हजारांहून अधिक रुग्णांची नोंद; काल दिवसभरात 5 हजार 257 नवे कोरोनाबाधित, वाढत्या रुग्ण संख्यने प्रशासनाची चिंता वाढली
6. सोलापूरचे महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांना कोरोनाची लागण, अप्पर आयुक्त विजय खोराटे यांच्याकडे अतिरिक्त भार, तर पी शिवशंकर यांचं वर्क फ्रॉम होम
7. दक्षिण मुंबईसह उपनगरात रात्रभर मुसळधार पाऊस, पाणी साचल्याने हिंदमाता परिसरात वाहनं अडकून पडली
8. देहू, आळंदीमध्ये एसटी पोहोचल्या, इतिहासात पहिल्यांदाच एसटीने पंढरीला जाणार तर नाशिकमधून निवृत्तनाथांची पालखी आज रवाना होणार
9. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात इराणमध्ये अटक वॉरंट जारी, बगदादमधील ड्रोन हल्ल्याला जबाबदार असल्याचा आरोप
10. मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सीरिज पाहणं टाळा, ऑनलाईन फ्रॉड होत असल्याने महाराष्ट्र सायबरचं आवाहन