स्मार्ट बुलेटिन | 03 डिसेंबर 2020 | गुरुवार | एबीपी माझा


शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा आठवा दिवस, दुपारी सरकारसोबत दुसरी बैठक, देशाचं लक्ष दिल्लीतल्या शेतकरी आणि सरकारच्या बैठकीकडे


शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रात काँग्रेससह शेतकरी संघटनांचं आंदोलन, नाशिक, धुळ्यात मोर्चा तर परभणीत चक्काजाम

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, अंतिम निकालास उशीर होण्याची शक्यता


ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आरक्षण बचाव मोर्चा, छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ मोर्चात सहभागी होणार

सीबीएसई बोर्डची 2021 ची परीक्षा ऑनलाईन नाही तर लेखी होणार, सर्व कोविड मार्गदर्शक तत्त्वे पाळली जाणार

पालघरमध्ये वाढवण बंदर उभारणी प्रकल्पाला स्थानिक, मच्छिमार आणि शेतकऱ्यांचा तीव्र विरोध, समुद्रावर मानवी साखळी करुन आंदोलन

हिवाळी अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत घेण्यावर चर्चा, विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची आज बैठक

मालेगाव स्फोटाप्रकरणी आजपासून सेशन कोर्टात सुनावणी, केसमधील आरोपींना हजर राहण्याचे आदेश

जगभरात कोरोनामुळं एका दिवसात 12 हजार लोकांचा मृत्यू, 24 तासात 6 लाख 26 हजार नवे रुग्ण

केरळ, तमिळनाडूमध्ये हाय अलर्ट जारी; उद्या धडकणार 'बुरेवी' चक्रीवादळ