देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. देशभरात आज कोरोना लसीचा ड्राय रन; महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश



  1. भारतात आपत्कालिन वापरासाठी सीरमच्या 'कोविशिल्ड' ला हिरवा कंदील, औषध महानियंत्रकांच्या मंजुरीची प्रतिक्षा



  1. ब्रिटन ते भारत आंतरराष्ट्रीय विमान सेवा 8 जानेवारीपासून सुरु होणार, विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांची माहिती



  1. सरकारसोबत 4 जानेवारीला होणाऱ्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करणार, शेतकरी संघटनांचा इशारा



  1. लॉकडाऊनमुळे मरगळलेली अर्थव्यवस्था हळूहळू ट्रॅकवर, डिसेंबरमध्ये 1.15 लाख जीएसटीची वसूली



  1. मुद्रांक शुल्क कपातीमुळे बांधकाम क्षेत्रात तेजी; राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मिळाली चालना, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांती माहिती



  1. पीएमसी घोटाळ्यातून मिळालेली रक्कम कर्ज म्हणून वर्षा राऊत यांना दिली, ईडीचा आरोप; प्रवीण राऊतांच्या 72 कोटींच्या संपत्तीवर टाच



  1. जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे मुंबईत 5 आणि 6 जानेवारीला पाणीकपात, पाणी जपूर वापरण्याचं पालिकेचं आवाहन



  1. अवैध शस्त्र विक्री करणा-यांवर मुंबई पोलिसांची कारवाई, 3 पिस्तूल 1 मॅगझीनसह जिवंत काडतुसे जप्त



  1. तिसऱ्या कसोटीवर कोरोनाचं सावट, SCG नजीकचा परिसर अलर्टवर; सामना प्रेक्षकांविना करण्यासंदर्भात चर्चा सुरु