1. दोन दिवसांत खातेवाटप करु, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, महाराष्ट्रातल्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेण्याची प्रक्रियाही प्रशासनाकडून सुरु


2. आरे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश, आरे कारशेडला स्थगिती दिल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय

3. विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीसाचं अभिनंदन करताना उद्धव ठाकरेंच्या कोपरखळ्या आणि टोमणे, काँग्रेसमधल्या दिग्गजांना मागे टाकत नाना पटोले विधानसभाध्यक्षपदी विराजमान

4. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगाराला वाचवताना अग्निशमन दलाच्या जवानासह कामगाराचा मृत्यू; दोन जवानांसह दोन तरूण बचावले, पिंपरी चिंचवडमधील घटना

5. मुंबई आयआयटीतल्या इंजिनीअरला तब्बल 1 कोटी 17 लाखांचं पॅकेज, प्लेसमेंटच्या पहिल्याच दिवशी मायक्रोसॉफ्टची ऑफर



6. हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणी 90 तासांनी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका, आरोपींना कठोर शिक्षा सुनवण्यासाठी खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश

7. भारतीय नौदलात आज पहिली महिला पायलट रुजू होणार, दीड वर्षांच्या सरावानंतर शिवांगी स्वरुप यांची नौदल पायलट म्हणून नियुक्ती, कोच्चीत शिवांगीचं पोस्टिंग

8. कांद्याला पेट्रोलचा भाव आल्याने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी; खुल्या बाजारात कांद्याचा भाव प्रतिकिलो 80 ते 100 रुपये, इजिप्तनंतर आता तुर्कीकडूनही आयात होणार कांदा

9. आता आठवड्याचे सातही दिवस 24 तास एनईएफटी सेवा, ऑनलाईन व्यवहार करणाऱ्यांना मोठा दिलासा, तर उद्यापासून मोबाईल सेवा महागणार

10. भारतीय फलंदाज रोहित शर्माचं ब्रायन लाराचा 400 धावांचा विक्रम मोडू शकतो; ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा विश्वास