देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. राज्यात 40 नव्या रूग्णांमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 340वर, एकट्या मुंबईत 30 नव्या रूग्णांची भर आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू


2. कोरोनामुळे अमेरिकेत मृत्यूचं तांडव, 24 तासांत एक हजाराहून अधिक बळी, तब्बल सव्वा दोन लाख रूग्ण


3. महाराष्ट्रात आलेल्या तब्लिकींना शोधण्याचं आव्हान, मुंबईत सव्वा चारशेहून अधिक लोकांचा संचार, राज्यातील बहुतांश शहरात वावर


4. कोणताही धार्मिक कार्यक्रम कराल तर खबरदार, मरकज प्रकरणावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तंबी


5. मुंबईत पाच हजारांहून अधिक जण कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आल्याने धोका वाढला, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, संसर्ग रोखण्यासाठी चार हजार जणांचं पथक बनवणार


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 02 एप्रिल 2020 | गुरुवार | ABP Majha



6. इतिहासात पहिल्यांदाच रामनवमीचा उत्सव साधेपणात, शिर्डीतील सोहळा रद्द, गर्दी न करण्याचं आवाहन, दुपारी 12 वाजता एबीपी माझावर गीत रामायण


7. कोरोनाशी मुकाबला करताना होमिओपॅथी डॉक्टरांना संधी का मिळू नये? होमिओपॅथी डॉक्टरांचा सवाल


8. PM Cares Fund सुरु करुन पंतप्रधान मोदींनी सेल्फ प्रमोशनची संधी सोडली नाही, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांची टीका


9. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं दिग्दर्शक राम गोपाल वर्माचं ट्वीट, मात्र डॉक्टरनेच एप्रिल फूल केल्याची सारवासारव, भावना दुखावल्याने चाहत्यांच्या तिखट प्रतिक्रिया


10. कोरोनाचा प्रभाव क्रीडा विश्वावरही, जूनमध्ये होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेचं आयोजन रद्द, दुसऱ्या महायुद्धानंतर पहिल्यांदाच विम्बल्डन स्पर्धा रद्द