देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्यातील लॉकडाऊन तूर्तास उठणार नाही, गर्दी केल्यास पुन्हा लॉकडाऊन; मुख्यमंत्र्यांचा इशारा, कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मा दान करण्याचं आवाहन
2. कोरोनाची वस्तुस्थिती लपवण्यासाठी राज्य सरकारचा प्रयत्न, देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर टीका, मुंबईत संक्रमणाचं प्रमाण 27 टक्क्यांवर गेल्याचा आरोप
3. संसर्ग रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी, 2 किलोमीटरच्या परिसरातच फिरण्याचं आवाहन, काल दिवसभरात तब्बल 5 हजार वाहनांवर कारवाई
4. राज्यात काल दिवसभरात कोरोनाचे 5 हजार 493 नवे रुग्ण, रुग्णांची संख्या 1 लाख 64 हजारांच्या पुढे, दिवसभरात 156 कोरोना बाधितांची मृत्यू
5. गेल्या 48 तासांत 50 पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त, आतापर्यंत 57 कोरोना बाधित पोलिसांचा मृत्यू, तर 3 हजार 608 जणांची कोरोनावर मात
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 जून 2020 | सोमवार | ABP Majha
6. पडळकरांच्या वक्तव्यावरुन हसन मुश्रीफ यांची भाजपवर टीका, तर राज्यात कोण चंपा म्हणतं, कोण टरबुजा म्हणतं, हे कसं चालतं?, चंद्रकांत पाटलांचं प्रत्युत्तर
7. गेल्या 20 दिवसांपासून होणाऱ्या इंधन दरवाढिविरोधात काँग्रेस आक्रमक, देशभरात पेट्रोल-डिझेल दरवाढिविरोधात आंदोलन करणार
8. राहुल गांधींवर बोलताना प्रज्ञा ठाकूर यांची जीभ घसरली, विदेशी स्त्रीचा मुलगा देशभक्त असू शकत नाही, प्रज्ञा ठाकूर यांचं वक्यव्य
9. भारत-चीन सीमा वादावरुन भाजप-काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरुच, चिनी कंपन्यांनी पीएम केअर्स फंडला कोट्यवधींचा निधी दिला का?, बाळासाहेब थोरातांचा सवाल
10. निशस्त्र भारतीय जवानांसोबत लढण्यासाठी चीनची नवी खेळी, एलएसीवर चिनी सैनिकांना मार्शल आर्टचं प्रशिक्षण देण्याची तयारी