देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...

  1. महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल आज जाहीर होणार, बोर्डाच्या वेबसाईटवर दुपारी 1 वाजता निकाल विद्यार्थ्यांना पाहता येणार

  2. फ्रान्सवरुन निघालेलं राफेस विमान आज भारतात पोहोचणार, दुपारी 1 वाजता वायुसेनेच्या अंबाला बेसवर आगमन

  3. आजपासून पुढील पाच दिवस कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र, विदर्भातही तुरळक सरी; हवामान खात्याचा अंदाज

  4. वाढीव वीजबिलावरुन सरकार दिलासा देण्याच्या प्रयत्नात, सकारात्मक तोडग्याबाबत मंत्रिमंडळात चर्चा; लॉकडाऊनच्यापूर्वी युनिटनुसार बिल देण्याची शक्यता

  5. राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोना रुग्णवाढीपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा जास्त; 10333 रुग्ण कोरोनातून बरे तर 7717 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  6. कोरोनाच्या संकटातही बळीराजाची मोठी कामगिरी, खरीप हंगामातील पेरणीमध्ये तब्बल 44 टक्क्यांनी वाढ

  7. सोलापुरातील बेकरी चालकाच्या हत्येचे गूढ उकलले, मुलानेच केली चारित्र्यहीन बापाची हत्या; पोलिसांनी 24 तासात हत्येचा गुंता सोडवला

  8. सांगलीत परप्रांतीय तरुणाचं अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन, गावातील तरुणांकडून चाकूने भोसकून खून; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून चार संशयितांना ताब्यात

  9. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा; आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सुशांतच्या वडिलांचा आरोप, आज अटक होण्याची शक्यता

  10. कोरोनानंतरच्या पहिल्याच वेस्ट इंडिजविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडची सरशी; स्टुअर्ट ब्रॉडची विक्रमी कामगिरी