- देशात नवे 75 मेडिकल कॉलेज सुरू होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, काश्मीरमध्येही ५० हजार सरकारी पदांवर मेगाभरती होणार
- बेस्ट कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणाचा तिसरा दिवस, सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळण्याचं आश्वासन, मात्र फसवणूक होत असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा
- विनाअनुदानित शाळांना 20 टक्के अनुदान देण्याचा सरकारचा निर्णय, लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, आंदोलक शिक्षकांचा आक्रमक पवित्रा
- विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचा एकीकडे युतीचा दावा तर दुसरीकडे स्वबळाची तयारी, भाजपकडून 288 जागांवर इच्छुकांच्या मुलाखती
- लोकसभेच्या आधीच विधानसभेसासाठीचा फॉर्म्युला फिक्स, उद्धव ठाकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला
- मुंबईतील उद्यानं आता दिवसभर खुली राहणार, महापालिकेच्या निर्णयानं मुंबईकरांना दिलासा
- राज्यातील निवासी डॉक्टरांच्या समस्या वेळच्यावेळी सोडवा, हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश
- बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाविरोधात हायकोर्टात याचिका, प्रस्तावित पुनर्विकासामुळे रहिवाशांचे आरोग्य आणि मुलभूत हक्काचे नुकसान होणार असल्याचा आरोप
- विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारचा निर्णयांचा धडाका, मंत्रिमंडळाच्या बैठकीत तब्बल 25 मोठे निर्णय
- राष्ट्रीय खेळदिवसानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते फिट इंडिया अभियानाचा शुभारंभ, आरोग्यविषयक जागृती करण्याचा मुख्य उद्देश