1. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नऊ हजारांच्या पार, 729 नव्या रुग्णांची भर, दिवसभरात 31 जणांचा मृत्यू, तर मुंबईतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6 हजार 169
2. जगभरात 31 लाख 36 हजार कोरोनाबाधित, मृत्यूंचा आकडा 2 लाख 17 हजारांवर, कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला
3. कोरोनाविरोधातल्या लढ्याला एमएमआरडीएकडून बळकटी, BKCमध्ये 1000 खाटांचे रुग्णालय तयार करणार, तर 500 बेडवर ऑक्सिजनची सोय
4. प्लाझ्मा थेरपी अजून प्रायोगिक पातळीवर; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती, प्लाझ्मा थेरपीचा योग्यरित्या वापर न केल्यास जीवाला धोका होण्याचाही इशारा
5. सरकारचं एका रुपयाचंही नुकसान झालं नाही, चीनमधून मागवलेल्या रॅपिड टेस्टिंग किटबाबत ICMR चं स्पष्टीकरण
6. राजस्थानच्या कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रातील 1780 विद्यार्थी लवकरच परतणार, राज्य परिवहन मंडळाच्या 92 बस आज धुळ्यातून रवाना होणार
7. देवेंद्र फडणवीस त्यांच्या पदाला न शोभणारं राजकारण करत आहेत, राज्यपाल भेट आणि पालघर हत्याकांडावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांची टीका
8. विधानपरिषदेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नियुक्ती करावी, महाविकास आघाडीच्या नेत्यांची राज्यपालांना शिफारस
9. विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, धान विक्रीत मुदतवाढ मिळालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून प्रोत्साहन अनुदानाचा लाभ, छगन भुजबळ यांची माहिती
10. पालघरजवळच्या गडचिंचले तिहेरी हत्या प्रकरणी पोलिसांवर कारवाई, कासा पोलीस ठाण्यातील 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या