1. कृषी विधेयकाविरोधात राज्य सरकारांनी कायदे करावेत, काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनिया गांधी यांचा सल्ला, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष


2. आर्थिक दुर्बल घटकांच्या लाभामुळे मराठा आरक्षणाची लढाई कमकुवत होत असल्याची खासदार संभाजीराजेंची भावना; मुख्यमंत्री आणि अशोक चव्हाणांची भेट घेणार


3. राज्यातील रेस्टॉरंट्स ऑक्टोबरमध्ये सुरु होण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांची रेस्टॉरंट असोसिएशनसोबत चर्चा, लवकरच गाइडलाईन्स जाहीर होणार


4. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एम्स रुग्णालयानं सीबीआयला अहवाल सोपावला, सुशांतची आत्महत्या की हत्या, अहवालाच्या आधारे सीबीआय पुढील तपास करणार


5. गुजरातमधील बडोद्यात तीन मजली इमारत कोसळली, आतापर्यंत तीन कामगारांचा मृत्यू, बचावकार्य युद्धपातळीवर सुरु


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 सप्टेंबर 2020 | मंगळवार | ABP Majha



6. मुंबईतील आकाशवाणी आमदार निवासात बॉम्ब ठेवल्याचा निनावी फोन, रात्रभर प्रत्येक खोलीची कसून तपासणी, अफवा असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर आमदार निवासात सर्वांना प्रवेश


7. कंगनानं दाखल केलेल्या मुंबई हायकोर्टातील याचिकेवर आज संजय राऊतांच्या वतीने बाजू मांडली जाणार, तर कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई योग्य होती का? हायकोर्टाचा पालिकेला सवाल


8. वाढत्या गर्दीमुळे मुंबईतील कार्यालयांच्या वेळा बदलण्याची चर्चा, पश्चिम रेल्वेचा पॅटर्न सरकारी कार्यालयामध्येही राबवण्यावर विचार


9. जगभरातील एकूण कोरोना बाधितांपैकी 54 टक्के कोरोनाग्रस्त अमेरिका, भारत आणि ब्राझीलमध्ये, तर सर्वाधिक कोरोना बाधितांच्या संख्येत भारत दुसऱ्या क्रमांकावर


10. रंगतदार सामन्यात रॉयल चॅलेंजर बंगलोरची बाजी, सुपर ओव्हरमध्ये मुबई इंडियन्सवर मात, मुंबईच्या ईशान किशनची झुंजार खेळी व्यर्थ