देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...
1. राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही, आरक्षण स्थगितीवरील सुनावणी पुढे ढकलल्यानंतर उदयनराजेंचा इशारा; तर शालेय प्रवेश, नोकरभरती सुरु करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी
2. उसतोड कामगारांच्या नेतृत्त्वावरून पंकजा मुंडे, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात रस्सीखेच, भाजपनं सुरेश धस यांना धाडलेल्या पत्रावरुन पंकजा मुंडेंची नाराजी
3. कांदा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज शरद पवार नाशिकमध्ये, लिलावात सहभागी न होणाऱ्या व्यापाऱ्यांशी चर्चा करणार, शेतकऱ्यांशी संवाद साधणार
4. विधानपरिषद सदस्यांसाठी काँग्रेसकडून उर्मिला मातोंडकरांना संधी मिळण्याची शक्यता, राष्ट्रावादीकडून खडसे, शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकरांच्या नावाची चर्चा
5. कोरोना संकटात मुंबई-पुणेकरांना दिलासा, मुंबईचा डबलिंग रेट 139 दिवसांवर, तर पुण्याचा रुग्ण बरे होण्याचा दर सर्वाधिक
पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 ऑक्टोबर 2020 | बुधवार | ABP Majha
6. 711 किलोमीटरच्या मुंबई-पुणे हायस्पीड रेल्वेसाठी निविदा मागवल्या, मुंबई-नागपूर हायस्पीड रेल्वे प्रकल्पाचाही मुंबई कॉर्परेशनकडून आढावा
7. हत्येसाठी 2 कोटींची सुपारी, परभणीचे आमदार संजय जाधव यांची पोलिसांत तक्रार; एका बड्या व्यक्तीने सुपारी दिल्याचा जाधवांचा दावा
8. बिहार निवडणुकांच्या 71 जागांसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान, माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझींसह आठ मंत्री रिंगणात, तर मोदींसह राहुल गांधींच्या सभांचा उडणार धुरळा
9. जम्मू-काश्मिरमध्ये जमीन खरेदी करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी, डोमेसाइलची अट शिथिल, उद्योगधंद्यांना चालना देण्यासाठी निर्णय
10. हैदराबादकडून दिल्लीचा 88 धावांनी पराभव, हैदराबादचं स्पर्धेतील आव्हान कायम; तर आज मुंबई आणि बंगलोर आमने-सामने