1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुणे दौऱ्यावर, संध्याकाळी सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार, लसीच्या प्रगतीची माहिती घेणार, झायडस कॅडिला आणि भारत बायोटेक लॅबचीही पाहणी करणार
2. जगभर कोरोनाव्हायरस पसरवणाऱ्या चीनच्या उलट्या बोंबा, 2019 मधील उन्हाळ्यात भारतातून कोरोनाचा फैलाव, चिनी वैज्ञानिकांचा आरोप, ब्रिटनच्या वैज्ञानिकांचा चीनवर पटलवार
3. नवी मुंबई कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी टेस्टिंग इन्चार्ज डॉ. सचिन नेमाणे निलंबित, एबीपी माझाचा इम्पॅक्ट, उपायुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
4. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं निधन, पुण्यातील रुबी रुग्णालयात अखेरचा श्वास, आज पंढरपुरातील सरकोली गावात अंत्यसंस्कार
5. कांजूरमार्ग मेट्रो कारशेड जागेप्रकरणी केंद्र सरकारची मुंबई उच्च न्यायालयात याचिका, राज्य सरकारला आठवडाभरात भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
6. मुंबईसाठी घेतलेल्या कुठल्याही निर्णयाने मुंबई द्वेषींच्या पोटात दुखतं, आदित्य ठाकरेंचा भाजपला टोला, मेट्रो कारशेड बदलणं आर्थिकदृष्ट्याही हिताचं असल्याचा दावा
7. महाविकास आघाडी सरकारची आज वर्षपूर्ती, पुढील निवडणुकाही एकत्र लढण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत तर भाजपकडून आजपासून तीन दिवस पत्रकार परिषदा
8. फ्यूज उडाले नाही तर महाविकास आघाडीचे सरकार 20 वर्ष टिकेल, शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांची अशोक चव्हाण आणि अजित पवार यांना कोपरखळी
9. विदेशी चलनप्रकरणी बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडकडून आठ तास चौकशी, प्रताप सरनाईकांच्या कार्यालयावरही ईडीचा छापा
10. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दीड कोटींचा दंड वसूल, लोकल ट्रेन आणि लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये मध्य रेल्वेची कारवाई