1. महाराष्ट्रात 31 मे नंतरही लॉकडाऊन कायम राहणार, राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत निर्णय, तर सर्वसामन्यांसाठी लोकल बंदच, विजय वडेट्टीवार यांची माहिती 


2. दहावीच्या परीक्षेबाबत आज निर्णय होण्याची शक्यता, परीक्षा न घेण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम, विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करुन उत्तीर्ण करण्याचा प्रस्ताव, शिक्षणमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा


3. मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजे आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि प्रकाश आंबेडकरांना भेटणार


4. पदोन्नती आरक्षणाचा जीआर रद्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, मंत्री नितीन राऊतांची माहिती तर मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक होणार


5. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवली, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय, अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारीतील वाढ रोखण्यासाठी पाऊल


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 28 मे 2021 | शुक्रवार | ABP Majha



6. दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना आता घराजवळच्या केंद्रावर लस घेता येणार,  केंद्राच्या नव्या नियमावलीमुळे मोठा दिलासा


7. केंद्र सरकारची नियमावली लागू करण्यासाठी ट्विटरनं मागितली 3 महिन्यांची मुदत, केंद्र सरकारच्या नोटीशीनंतर ट्विटरची मुदतवाढीची मागणी


8. पंतप्रधान मोदींचा आज ओडिशा आणि पश्चिम बंगाल दौरा, यास चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार, आढावा बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार


9. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोकसीला भारताच्या ताब्यात देण्याऐवजी अँटिगा-बार्बुडाला पाठवणार, डोमिनिका सरकारचा निर्णय


10. 'कोरोना चीनमधून आलाय का? तीन महिन्यात अहवाल द्या', अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून गुप्तचर यंत्रणांना आदेश