1. अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात आज निर्णय, यूजीसीच्या गाईडलाईन्सना अनेकांचं आव्हान;  निकालाकडे देशाचं लक्ष


 

  1. रियाचा भाऊ शोविकची सीबीआयकडून काल आठ तास चौकशी, तर ईडीकडून बँकेतल्या कागदपत्रांची सात तास तपासणी; तपासासाठी नार्कोटिक्स ब्युरोचं पथक मुंबईत


 

  1. राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यास लोकल धावणार, मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती; निर्णयाचा सर्वस्वी अधिकार राज्य सरकारच्या हातात


 

  1. जेईई आणि नीट परीक्षा रद्द करण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार, प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात गल्लीपासून दिल्लीपर्यंत निदर्शनं


 

  1. राज्यात काल दिवसभरात 14 हजार 718 नव्या कोरोना बाधितांची नोंद, 355 जणांचा मृत्यू तर 9 हजार 136 जणांना डिस्चार्ज


 

  1. जगभरात कोरोनाचा कहर सुरुच,  गेल्या24 तासात2 लाख 63 हजार 333 नव्या कोरोना बाधितांची नोंद


 

  1. कोरोना देवाची करणी, जीएसटी कलेक्श्नवर परिणाम करणारा अदृश्य घटक; अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांचं वक्तव्य


 

  1. विठ्ठलाच्या पायावर अल्कोहोलयुक्त सॅनिटायझर मारण्यास वारकरी संप्रदायाचा विरोध, विठ्ठलाचं पदस्पर्श करुन दर्शन काही दिवस बंद ठेवण्याची मागणी


 

  1. महाराष्ट्र विधान मंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व सदस्य, अधिकाऱ्यांना कोरोना चाचणी बंधनकारक


 

  1. प्रेम प्रकरण उघड होण्याच्या भीतीने मित्राचाच गळा आवळला; पालघरच्या बोईसर परिसरातील धक्कादायक प्रकार, 24 तासांत दोन आरोपींना बेड्या