देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...




  1. वर्षभरात महाराष्ट्राने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात काय कमावलं, काय गमावलं?, राजकीय दिग्गजांशी चर्चा; एबीपी माझाचा #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन कार्यक्रम, पाहा आज दिवसभर



  1. नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली, ती आमची चूक, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची कबुली



  1. मोकळी भांडीच जास्त आवाज करतात; सत्तांतराची भाषा करणाऱ्या विरोधकांना खासदार सुप्रिया सुळे यांचा टोला



  1. वेश्या व्यवसायातील महिलांना राज्य सरकारचा दिलासा; ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान दरमहा 5 हजारांची मदत



  1. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार; पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती



  1. जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जळगावच्या सुपुत्राला वीरमरण; वयाच्या 21व्या वर्षी देशासाठी प्राणांची आहुती



  1. ड्रग्ज तस्करीप्रकरणी टॅक्सी चालकाला अटक, 32 ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि एलएसडी जप्त; टॅक्सी चालकाचा मुंबई सेंट्रलमधील उच्चभ्रूवस्तीत कोट्यावधींचा फ्लॅट



  1. लक्ष्मी विलास बँकेच्या विलनीकरणाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार; आरबीआयचा निर्णय हा खातेधाराकांच्या हितासाठीच आहे, हायकोर्टाचं मत



  1. अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर दिशा सॅलियन हिच्या मृत्यू प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली



  1. रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर का नाही याबाबत माला कल्पना नाही, रोहित शर्माच्या दुखापतीबाबत विराट कोहलीचं मोठं वक्तव्य; आजपासून वनडे मालिकेला सुरुवात