देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा 5 वर, राज्यात कोरोनाचे 131 रुग्ण तर देशातील आकडा सातशेपार

पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधील पहिले तिन्ही रुग्ण कोरोनामुक्त, दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह, आज डिस्चार्ज देणार तर पनवेलमधील रुग्णालाही डिस्चार्ज

कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी सोबत काम करणार, जी 20 देशांचा संकल्प, पहिल्यांदाच व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक

खाजगी डॉक्टर्सनी दवाखाने बंद ठेवू नयेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन, तर इतर राज्यांतील अडकलेल्या नागरिकांची राज्य शासन काळजी घेणार

लोकांची गैरसोय टाळण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवणार, मुख्यमंत्री ठाकरे यांचा निर्णय

राज्यातील आठ खाजगी लॅबना कोरोना तपासणी केंद्राची मान्यता, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती

मुंबई उच्च न्यायालयात 15 एप्रिलपर्यंत तातडीच्या सुनावणींसाठी केवळ एकच खंडपीठ कार्यरत, उच्च न्यायालय प्रशासनाकडून परिपत्रक

कोरोना व्हायरससोबत लढण्यासाठी प्रभासकडून चार कोटींची मदत; राष्ट्रवादीचे आमदार-खासदार एक महिन्याचं वेतन तर सौरव गांगुली 50 लाख रुपयांचे तांदूळ देणार

जिल्ह्यातील खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश, जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यावर यंत्रणा सतर्क

सोलापुरात कोरोनोमुळे जिल्हाबंदीसाठी रस्ता खोदला, उपचाराअभावी हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णाचा मृत्यू