1. काँग्रेसची अवस्था 2014 पेक्षाही वाईट होणार, मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल, मध्यमवर्गियांसह मच्छिमार, डबेवाले, टॅक्सीचालकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न


 

  1. पंतप्रधान मोदींनी देशातील जनतेला फसवण्याचं काम केल्याचा राहुल गांधींचा घणाघात, संगमनेरमधील सभेत जीएसटी, राफेल, शेतकरी आत्महत्यांवरुन निशाणा


 

  1. शेतकरी आत्महत्यावरुन राज ठाकरेंचा भाजपवर निशाणा, सिंचन घोटाळ्यात कारवाई का केली नाही, नाशकातून राज यांचा फडणवीसांना सवाल




  1. मोदी हा मोठा ब्लॅकमेलर, आधी काँग्रेसला ब्लॅकमेल केलं आता शिवसेनेला ब्लॅकमेक केलं, मुंबईतील सभेत प्रकाश आंबेडकरांची टीका


 

  1. राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेच्या व्यासपीठावर, मोदींची स्तुती, पवार आणि थोरातांवर टीका, तर काँग्रेसकडून विखेंना कारणे दाखवा नोटीस


 

  1. अंबानींचं तळ्यात मळ्यात, नरेंद्र मोदींच्या सभेला मुकेश अंबानींचे पुत्र अनंत अंबानींची उपस्थिती


 

  1. मतदानयंत्र आणि व्हीव्हीपॅट मशिनबाबत केलेली तक्रार चुकीची ठरल्यास तक्रारदाराला दंड, निवडणूक आयोगाच्या जाचक नियमावलीविरोधात हायकोर्टात याचिका


 

  1. एबीपी माझाच्या बातमीनंतर नाशिक जिल्हा प्रशासनाला जाग, बर्ड्याच्यावाडीतील दुष्काळी स्थितीची पाहणी, टँकरने पाणीपुरवठा केला जाणार


 

  1. जगभरात अॅव्हेंजर्स एन्डगेमची तुफान क्रेझ, पहिल्याच दिवशी बाराशे कोटींपेक्षा अधिक गल्ला जमवणारा एकमेव सिनेमा, मध्यरात्रीही सिनेमा हाऊसफुल्ल


 

  1. मुंबईकडून चेन्नईचा 46 धावांनी धुव्वा, रोहित शर्माचे शानदार अर्धशतक तर मलिंगाच्या चार विकेट्स