देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये...


1. ड्रग सेवनाच्या आरोपानंतर रिया रक्त चाचणीसाठी तयार, वकिलांची माहिती, तर सखोल तपासासाठी ईडीचं अंमली पदार्थ विरोधी पथकाला पत्र


2. सुशांतचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्स चालकाला चार कॉल केल्यानं निर्माता संदीप सिंह अडचणीत, तर संदीपच्या संपर्कात असलेल्या अंकिता लोखंडेच्याही चौकशीची शक्यता


3. मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी, पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी दाखल याचिकेवर फैसल्याची शक्यता


4. इतर राज्यातील मंदिरं खुली झाली महाराष्ट्रातील कधी होणार? सामान्य भक्तांसह अध्यात्मिक संघटनांचा सवाल, 28 तारखेला घंटानाद आंदोलनाची हाक


5. कोरोनावरील भारतीय कोवॅक्सिन लस निर्णायक टप्प्यात, नागपूरमध्ये लस दिलेल्या 55 स्वयंसेवकांच्या रक्त चाचणीला सुरुवात


पाहा व्हिडीओ : Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 26 ऑगस्ट 2020 | बुधवार | ABP Majha



6. नागपुरातल्या नगरसेवकांची तुकाराम मुंढेंविरोधात नवी मोहीम, मुंढेंनी घोषित केलेल्या योजनांची सत्यता तपासण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांची सत्यशोधक समिती


7. महाड इमारत दुर्घटनेत 12 जणांचा मृत्यू, दोघांना सुखरुप बाहेर काढलं, तर एकाचा अद्यापही शोध, गेल्या 36 तासांपासून बचावकार्य युद्धपातळीवर सुरु


8. पतीच्या मृत्यूनंतर पहिल्या पत्नीलाच संपत्तीवर हक्क, मात्र दुसऱ्या पत्नीची मुलं असल्यास तेही संपत्तीतील वाटेकरी, मुंबई उच्च न्यायालयाचं मत


9. महाराष्ट्रातली आणखी एक संस्था गुजरातला हलवली; नागपूरच्या राष्ट्रीय खनिकर्म आरोग्य संस्थेचं अहमदाबादला स्थलांतर


10. स्टार फुटबॉलर मेस्सीची बार्सिलोनाला नोटीस, क्लब सोडण्याचे संकेत; मँचेस्टर सिटी क्लब मेस्सीला करारबद्ध करण्यासाठी आघाडीवर