2. देशातील कोरोना बाधितांचा आकडा 24 हजार पार; आतापर्यंत 5210 लोकांना डिस्चार्ज तर 779 लोकांचा मृत्यू
3. जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच, कोरोनामुळे आतापर्यंत दोन लाखांहून अधिक जणांचा बळी, एकूण कोरोनाबाधितांची संख्यां 28 लाखांवर
4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात', सकाळी 11 वाजता साधणार जनतेशी संवाद
5. पंतप्रधान नरेद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक, लॉकडाऊन संदर्भात महत्वाचे निर्णय घेण्याची शक्यता
6. राज्यातील दुकानं उघडण्याची तुर्तास शक्यता नाही, हॉटस्पॉट ठिकाणी शिथिलता होणार नाही; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
7. राजस्थानातील कोटामध्ये अडकलेले महाराष्ट्रीयन विद्यार्थी लवकरच घरी परतणार, विजय वडेट्टीवार यांची ट्विटच्या माध्यमातून माहिती
8. विद्यापीठ-महाविद्यालयीन परीक्षा आणि नवीन शैक्षणिक वर्षाबाबत यूजीसीकडे समित्यांच्या शिफारशी, मंत्री उदय सामंत यांची माहिती
9.राज्यात प्रथमच ऑनलाईन मुलाखतीद्वारे 'अ' दर्जाच्या 22 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या; गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कल्पनेतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुलाखती
10. घरी सोडण्याचे अमिष दाखवून ट्रक चालकांकडून भिवंडीतील परप्रांतीय कामगारांची आर्थिक लूट, पोलिसांकडून ट्रक चालकावर गुन्हा दाखल