गडचिरोली : जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या दुर्गम तसेच जिल्हा सामान्य रूग्णालयातील रिक्त 28 पदावरील गट 'अ' दर्जाच्या वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या शुक्रवारी नियुक्त्या करण्यात आल्या. यासाठी महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाईन पद्धतीने 35 हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेवून त्यापैकी 22 जणांची नियुक्ती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सोशल डिस्टंन्सिंगची अंमलबजावणी करून राज्यातील वेगवेगळया उमेदवारांनी आपल्या मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुर्ण केल्या. जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या नाविण्यपुर्ण कल्पनेतून या प्रक्रियेची अंमलबजावणी करण्यात आली.

Continues below advertisement

जिल्हा निवड समितीकडून 1 एप्रिल रोजी गट अ च्या वैद्यकिय अधिका-यांच्या नियुक्तीबाबत जाहिरात काढण्यात आली होती. जिल्ह्यातील विविध ठिकाणी 28 वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत अर्ज मागविण्यात आले होते. जिल्ह्यात दुर्गम भागात मोठ्या प्रमाणात रीक्तपदे असल्याकारणाने व कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमिवर सदर प्रक्रिया तातडीने पुर्णत्वास नेत जिल्हाधिकाऱ्यांनी 22 जणांना नियुक्ती पत्र दिले. येत्या आठ दिवसात त्यांना रूजू होण्यासाठी कळविण्यात येणार आहे. गडचिरोली जिल्हा आदीवासी आणि दुर्गम म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी नेहमीच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांची पदे रीक्त असतात. यासाठी जिल्हा निवड समितीने यावेळी नियुक्त केलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्यांना सलग तीन वर्षाचा करार करून नोकरी न सोडण्याची अट घातली आहे. यानुसार बॉण्ड करण्यास तयार असलेल्या 22 उमेदवारांना नियुक्ती देण्याचे ठरविण्यात आले आहे.

Coronavirus | राज्यात आज 811 नवे कोरोनाबाधित; कोरोनाबाधितांचा आकडा 7628

Continues below advertisement

पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने निवड जिल्ह्यातील आरोग्य सेवेतील अधिकारी कर्मचारी संख्येची गरज आणि काम करण्यासाठी तयार असलेल्या लोकांच्या संख्येमध्ये नेहमीच तफावत आढळून येते. जिल्हा दुर्गम असल्याने याठिकाणी सामाजिक बांधिलकीतून लोकांनी सेवा देणे गरजेचे आहे. आम्ही रीक्त पदे तातडीने भरली जावीत म्हणून अतिशय सोप्या पध्दतीने निवड प्रक्रिया राबविली. वेगवेगळ्या जिल्ह्यातून यामध्ये बीड, भंडारा, नागपूर, नांदेड येथून अर्ज केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घरी बसूनच ऑनलाईन पध्दतीने घेतल्या. एकुण 22 वैद्यकिय अधिकाऱ्यांना नियुक्ती आदेश देत असून, या नियुक्त्या कायम स्वरूपी असतील. यामध्ये त्यांना तीन वर्ष तरी नोकरी सोडता येणार नाही. यातून गरज असलेल्या दुर्गम भागात आरोग्य सेवा पुरविण्यासाठी मदत मिळणार आहे, असे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी यावेळी सांगितले.

#Corona | नागपूरमध्ये टेस्ट न करण्यासाठी 12 जण गोडाऊनमध्ये लपले, पोलिसांनी धाड टाकल्यावर प्रकार उजेडात