स्मार्ट बुलेटिन | 26 मे 2020 | मंगळवार | एबीपी माझा
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या वापरावर बंदी; WHOचे आदेश
राज्यात काल 2436 नवे कोरोनाबाधित, 60 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर
कोरोनाबाधित देशांच्या यादीत भारत दहाव्या स्थानी, काल देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद
जगभरात कोरोनाबाधितांचा आकडा 55 लाखांवर तर 23.61 लाख कोरोनामुक्त, अमेरिकेत मृतांचा आकडा लाखाच्या घरात
परप्रांतीय मजुरांसाठी सर्वाधिक ट्रेन गुजरातमधून, 853 ट्रेन गुजरातमधून तर 550 ट्रेन महाराष्ट्रातून सुटल्या
ठाण्यात पोलिसांच्या मदतीला आता रॅपिड अॅक्शन फोर्स, वागळे इस्टेट, कळवा-मुंब्रा परिमंडळामध्ये तैनात
राज्य सरकार अपयशी, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा; नारायण राणेंचा 'ठाकरे' सरकारवर हल्लाबोल
..तर महाराष्ट्राच्या परवानगीशिवाय यूपीच्या मजुरांना प्रवेश नाही, राज ठाकरे यांचा योगी आदित्यनाथांना इशारा
बीडमधील शिक्षकांना 'डिलिव्हरी बॉय'चं काम, मराठवाडा शिक्षक संघाची निर्णय मागे घेण्याची मागणी
कोरोनामुळे लोकसंख्या वाढण्याची शक्यता, फाऊंडेशन फॉर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेसचा रिसर्च