1. ऐतिहासिक विजयानंतर एनडीएच्या घटक पक्षांची आज बैठक, मुख्यमंत्र्यांसह उद्धव ठाकरे दिल्लीत, मोदींची पंतप्रधानपदी औपचारिक निवड होणार


 

  1. सोळावी लोकसभा विसर्जित, नरेंद्र मोदींचा राष्ट्रपतींकडे राजीनामा, 30 मे रोजी नव्या सरकारचा शपथविधी


 

  1. शपथविधीआधीच नरेंद्र मोदींचं परदेश दौऱ्यांचं वेळापत्रक तयार, शिखर परिषदेच्या निमित्ताने किर्गीस्तानला पहिला दौरा


 

  1. काँग्रेस कार्यकारिणीची आज नवी दिल्लीत बैठक, लोकसभा निवडणुकीतील पराभवाचं चिंतन होणार, राहुल गांधी राजीनामा देण्याची शक्यता


 

  1. पावसाळी अधिवेशनाआधी राज्यमंत्रिमंडळाचा विस्तार, ‘माझा’च्या कार्यक्रमात रावसाहेब दानवेंची माहिती, शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची चिन्हं


 

  1. मराठा आरक्षण कायदा केंद्रात पास झाला नाही तर मराठा समाज वंचित आघाडीसोबत, रावसाहेब दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधवांचा इशारा


 

7.  आम्ही हरलो तरीही पराभव मान्य नाही, तळकोकणात सेनेचा उमेदवार निवडून येणं संशयास्पद, नारायण राणेंचा सवाल

  1. सूरतमध्ये कोचिंग क्लास असलेल्या इमारतीला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या, 21 जणांचा मृत्यू, मोदींकडून सरकारला मदतीचे आदेश


 

  1. लोकसभा निवडणुकीत मुस्लीम खासदारांच्या संख्येत वाढ, मात्र भाजपच्या 303 मध्ये एकही मुस्लीम खासदार नाही


 

10.              Google Duo अॅपचं नवीन अपडेट, ग्रुप व्हिडीओ कॉलमध्ये एकाच वेळी 8 जणांशी बोलता येणार